Good Morning Wishes Messages: सकाळची सुरवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस खूप चांगला जातो. प्रत्येक सकाळ एक नवे किरण आणि उत्साह घेऊन येते. अशा वेळी तुम्ही एकमेकांना काही उत्तम मेसेज पाठवून गुड मॉर्निंग शुभेच्छा देऊन आपल्या दिवसाची आनंदी सुरुवात करू शकता. पाहा बेस्ट गुड मॉर्निंग मॅसेज
गुड मॉर्निंग मॅसेज
सूर्या, तू त्यांना माझा निरोप दे
आनंदाचा दिवस आणि हास्याची संध्याकाळ दे
जेव्हा ते प्रेमाने माझा हा संदेश वाचतील,
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू दे.
गुड मॉर्निंग
पहाट जेव्हा जेव्हा तू येशील
तेव्हा सर्वांना आनंद घेऊन ये,
प्रत्येक चेहऱ्याला हास्य सजव
प्रत्येक अंगणात फुलं फुलव."
गुड मॉर्निंग
आकाशात इतके तारे आहेत की
आकाश दिसत नाही,
तुमच्या आयुष्यात इतके सुख आहे की
दु:ख दिसत नाही.
गुड मॉर्निंग
सूर्य उगवण्याची वेळ झाली आहे,
फुले फुलण्याची वेळ आली आहे,
गोड झोपेतून जागा हो मित्रा,
स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे.
शुभ प्रभात
रोज सकाळचे ऊन काहीतरी आठवण करून देतं,
प्रत्येक सुगंध जादू निर्माण करतो,
आयुष्य कितीही व्यस्त असलं तरी
सकाळ प्रियजनांची आठवण देऊन जाते
गुड मॉर्निंग
जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात
कृतज्ञ हृदयासोबत करता
तेव्हा आतून प्रकाश उजळून निघतो.
गुड मॉर्निंग
जीवनाचा सर्वात मोठा गुरू वेळ आहे,
कारण वेळ जे शिकवते
ते कोणीच शिकवत नाही.
गुड मॉर्निंग
गोड झोपेनंतर,
रात्रीच्या काही क्षणांनंतर,
सकाळची नवी सोनेरी स्वप्नं घेऊन,
जगातल्या काही प्रियजनांसोबत,
तुम्हाला छोटंसं शुभ प्रभात
गुड मॉर्निंग
असे नाही की माझ्या मॅसेजशिवाय
तुमचा सूर्योदय होत नाही
गोष्ट अशी आहे की,
तुमच्या सारख्या मौल्यवान लोकांचे स्मरण केल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही.
गुड मॉर्निंग