मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mental Health: मानसिक स्वास्थ्य खराब झालंय असं वाटतंय? स्वतःच करा स्वतःची मदत!

Mental Health: मानसिक स्वास्थ्य खराब झालंय असं वाटतंय? स्वतःच करा स्वतःची मदत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 09, 2024 01:10 PM IST

Mental Health Improvement Tips: आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकता.

Self talk can help to improve mental health
Self talk can help to improve mental health (Freepik)

Self Talk: आपलं मानसिक आरोग्य (mental health) राखणे फार गरजेचे आहे. आजकालच्या काळात मानसिक आरोग्य ठीक नसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरी लाइफस्टाइलमध्ये (lifestyle) तर ही फारच सामान्य समस्या झाली आहे. पण ही समस्या फारच धोकादायक आहे. पण हे लक्षात घ्या आपणच आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतो. अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. आपल्या मनात सकाळी उठल्याबरोबर अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. हे चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. ही मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वेळा आपण डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकतो. अनेक मोठ्या घटनांमध्ये तर आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण काही गोष्टी करून तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकता.

या टिप्स फॉलो करा

> जर तुमचे मानसिक आरोग्य बिघडले असेल तर तुम्ही स्वत: स्वतःची मदत करू शकता. सगळ्यात बेस्ट म्हणजे स्वतःची बोलले पाहिजे. यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. याचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होतो.

> जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता तेव्हा सकारात्मकता वाढते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

> स्वतःशी बोलण्याने तुमचा ताणही कमी होतो.

> याशिवाय तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

> स्वत:शी बोलणे चर्चा वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी योगदान देते.

> स्वतःशी बोलण्यामुळे तुम्हाला आव्हानांचा सामना करण्यासही मदत होते. सकारात्मकता आणि क्रिएटिव्हिटी वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel