Self Care Tips for Women: स्वत:ची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अनेकदा घरात आणि घराबाहेर काम करताना स्त्रिया स्वत:ची काळजी घेत नाहीत. ज्याचा परिणाम असा होतो की ती आनंदी राहू शकत नाही आणि आपल्या सभोवतालचे वातावरण आनंदी करू शकत नाही. खरं तर स्त्रियांना स्वत:पेक्षा आपल्या कुटुंबाची जास्त काळजी असते आणि त्या त्यांच्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी आधी स्वत:ची काळजी घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही स्वत:ला आनंदी आणि समाधानी करू शकाल. तुमचा मूड आणि आरोग्य चांगले असेल तर आजूबाजूचे वातावरणही आल्हाददायक, प्रसन्न दिसेल. महिलांसाठी सेल्फ केअर खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी आपल्या रूटीनच्या बिझी शेड्यूलमधून अशा प्रकारे स्वत:साठी वेळ काढावा.
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी स्वत:साठी वेळ काढणे कठीण आहे. पण ते करायलाच हवं. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल माहिती द्या.
शरीरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी आवश्यक आहे. सकाळी सर्वप्रथम पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल आणि शरीर सहज हायड्रेटेड होईल. यासोबतच सकाळच्या रुटीनमध्ये पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
दिवसभरात असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. सकाळी उठून आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या सुविधांबद्दल देवाचे आभार माना. असे केल्याने तुम्हाला दिवसभरात काही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल कृतज्ञ व्हाल.
चांगल्या विचारांसाठी चांगले आरोग्य आवश्यक आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी योगा क्लासला जा. इतकंच नाही तर दिवसभर आळस आणि थकवा जाणवत असेल तर योगा क्लासमध्ये सामील व्हा. यामुळे तुम्हाला मन रिलॅक्स करण्याची संधी मिळेल.
झोपेमुळे शरीरालाच नव्हे तर मनालाही आराम मिळतो. ज्यामुळे तुम्हाला चिडचिडेपणा कमी जाणवेल आणि नेहमी फ्रेश वाटेल. तसेच शरीरात ऊर्जा ही राहील. जेणेकरून सर्व कामे जलद गतीने आणि सुलभतेने होतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)