Saree Hacks: नवीन लग्न झालंय, पण साडीच नेसता येत नाही? 'ही' सोपी पद्धत वापरालं तर अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसाल!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Saree Hacks: नवीन लग्न झालंय, पण साडीच नेसता येत नाही? 'ही' सोपी पद्धत वापरालं तर अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसाल!

Saree Hacks: नवीन लग्न झालंय, पण साडीच नेसता येत नाही? 'ही' सोपी पद्धत वापरालं तर अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसाल!

Published Aug 06, 2024 02:35 PM IST

Easy way to wear a saree: साडी स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. जुन्या स्त्रिया आधीपासूनच साडी नेसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी साडी नेसणे हे काही अवघड नाही. पण आताच्या मुलींसाठी किंवा नवविवाहितांसाठी साडी नेसणे थोडे आव्हानात्मक आहे.

Easy way to wear a saree
Easy way to wear a saree (Pinterest)

Easy way to wear a saree: साडी हा एक भारतीय पारंपारिक पोशाख आहे. जो सध्या जगभरात लोकप्रिय होत आहे. साडीची खासियत म्हणजे ती कोणत्याही आकाराच्या स्त्रीवर चांगलीच दिसते. शिवाय साडी स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. जुन्या स्त्रिया आधीपासूनच साडी नेसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी साडी नेसणे हे काही अवघड नाही. पण आताच्या मुलींसाठी किंवा नवविवाहितांसाठी साडी नेसणे थोडे आव्हानात्मक आहे. त्यामुळेच अनेक स्त्रिया एकतर साडी पूर्व-प्लेटेड शिवून घेतात किंवा ती नेसणे टाळतात.

महत्वाचं म्हणजे साडी शिवून घेतल्याने ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर ती साडी महागडी असेल तर जास्तच नुकसान होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा साडी शिवून घेतली तर ती परत-परत त्याच पद्धतीने घालावी लागते त्यामध्ये नवीन असं काही नाही करता येणार. त्यामुळे तुम्हीच जर साडी नेसणे शिकलात तर ते अत्यंत सोयीस्कर ठरते. त्यामुळेच आम्ही तुमच्यासोबत एक अत्यंत सोपी DIY पद्धत शेअर करत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या ३० सेकंदात न शिलाई केलेली साडीसुद्धा सहजपणे नेसू शकता. यामध्ये साडी नेसण्यासाठी एबीसी ही ट्रीक वापरली जाते.

रेडिमेडसारखी साडी बनवण्याची पद्धत-

१) साडीचे माप घ्या-

सर्वप्रथम तुमच्या पदराचे माप घ्या. त्यासाठी आधी साडी उघडा आणि पदराचा भाग डाव्या खांद्यावर ठेवा. पदराची लांबी अशी असावी की, ती गुडघ्याच्या खाली जाईल. आता या ठिकाणी एक खूण करा आणि एका छोट्या कागदावर 'A' लिहून ते चिन्हांकित करा.

२) साडी सेट करा-

आता साडीला खांद्यापासून मागे घेऊन कंबरेपासून गुंडाळून समोर आणा. आणि ज्याठिकाणी तुमची नाभी येते, त्याठिकाणी 'बी' लिहून पिन लावून द्या.

३)कंबरेचे माप घ्या-

त्यानंतर आता साडीचा दुसरा शेवटचा भाग हातात धरा आणि कंबरेभोवती गुंडाळा, कंबरेचे योग्य माप घ्या त्याठिकाणी 'C' लिहा आणि त्यावर पिन करा.

४) फॅब्रिक सेट करा-

या सर्व स्टेपनंतर चौथी स्टेपसुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता बेडवर साडी पसरवा आणि त्याचे फॅब्रिक एकामागून एक ठेवा, 'B' पॉइंट ते 'C' पॉइंटपर्यंत १० ते १२ इंच अंतर ठेवा. लक्षात ठेवा की त्यांची रुंदी समान राहील. नंतर तिथे पिन करा.

साडी नेसण्याची सोपी पद्धत-

सर्वप्रथम कंबरेभोवती साडी गुंडाळा आता हातात ‘ए’ पॉइंट घ्या आणि कमरेभोवती टक करा आणि समोरच्या बाजूला ‘बी’ पॉइंट खोपा. आता फॅब्रिक व्यवस्थित सेट करा. उरलेले फॅब्रिक मागून वळवा आणि उजव्या हाताखाली पुढे आणा आणि काळजीपूर्वक डाव्या खांद्यावर 'C' पॉइंट ठेवा. आणि तो पिन करा. अशा प्रकारे तुम्ही प्री-प्लेटेड साडी घरी सहज बनवू शकता आणि ३० सेकंदात तयार होऊ शकते.

Whats_app_banner