Beauty Secrets of Sara Ali Khan: प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीची अप्रतिम स्टाईल सर्वांनाच आवडते. सारा आपल्या चुलबुल्या स्टाईलमध्ये सर्वांना भेटते आणि इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. सारा आज म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे, या खास प्रसंगी जाणून घ्या तिचे ब्युटी सीक्रेट. पाहा सारा अली खानच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य, जे तुम्ही सुद्धा सहज फॉलो करू शकता.
सारा अली खानचे सुंदर केस सगळ्यांना वेड लावतात. सुंदर केस मिळवण्यासाठी सारा कांद्याचा वापर करते. अभिनेत्री दररोज आपल्या केसांमध्ये याचा वापर करते. हा रस हेअर ग्रोथ वाढवतो आणि केस गळती रोखतो. तसेच कांद्याच्या रसामुळे केस आणि डोक्याच्या अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
सारा आपल्या त्वचेची चांगली काळजी घेते. यासाठी तिला स्वयंपाकघरातील नैसर्गिक वस्तूंचा वापर करायला आवडतो. साराला ब्रेकफास्टमध्ये फळे खायला आवडतात. अशा वेळी जी फळे शिल्लक राहतात, मग ती उरलेली फळे फेस मास्क म्हणून वापरते. त्याच बरोबर त्वचेचा रंग राखण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठी ती नैसर्गिक स्क्रबचा वापर करते. यासाठी ती बदाम पावडर आणि मध चेहऱ्यावर लावते.
साराला बेसनचे लाडू, पॅनकेक्स आणि वॅफल्स खायला खूप आवडतात. मात्र, फक्त आपल्या चीट डे ला ती साखरयुक्त पदार्थ खाते. याशिवाय चांगल्या त्वचेसाठी ती रोज पौष्टिक जेवण करते. ज्यात चिकन, मासे, डाळ, भाज्या, फळे, अंडी आणि ब्राऊन राईस यांचा समावेश आहे.
अभिनेत्री सारा झोपेशी कधीही तडजोड करत नाही. सारा रोज रात्री आठ तास झोपते. कारण जेव्हा आणप झोपतो तेव्हा शरीर स्वत:ची दुरुस्ती करते. अशा परिस्थितीत त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी दररोज रात्री ७ ते ९ तासांची क्वालिटी स्लीप घेणं खूप गरजेचं आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)