Samantha Ruth Prabhu Diet : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सध्या खूपच बारीक झाल्यासारखी वाटत आहे. ती एका आजाराशी देखील झुंज देत आहे. मात्र, या सगळ्यात तिने आपलं वजन संतुलित राखलं आहे. याबाबत चाहते अनेकदा तिला प्रश्न विचारतात. खरं तर पूर्वी या अभिनेत्रीला स्किन फिट कपड्यांमध्ये पाहून सगळेच थक्क झाले होते. नुकतंच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आस्क मी एनीथिंग सेशन केलं, ज्यात चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न तिच्या वजनावर आधारित होता.
अभिनेत्रीने आयोजित केलेल्या ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनमध्ये एका युजरने समंथाला वजन वाढवून थोडं लठ्ठ होण्यास सांगितलं. त्याला उत्तर देताना समंथा म्हणाली की, 'मी एका अतिशय कडक अँटी-इंफ्लेमेटरी डाएटवर आहे, जे माझ्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. या डाएटमुळे माझे वजन वाढत नाही.' त्याचबरोबर इतरांना असं मोजणं-मापणं बंद करून, प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगू द्या, असं ही समंथा म्हणाली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समंथाने सांगितले होते की, तिला मायोसायटिसचा त्रास आहे. ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीद्वारे हल्ला केला जातो. ज्यामुळे शरीरात खूप वेदना होऊ शकतात. मायोसिटिसमुळे स्नायू खूप तीव्र दुखतात. ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होतात आणि दैनंदिन काम करणे खूप कठीण होते.
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिने खुलासा केला आहे की, ती नेहमी अँटी-इंफ्लेमेटरी डाएट फॉलो करते. या डाएटमध्ये वेगवेगळ्या बेरी खाण्याचा समावेश आहे. बेरी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्या संपूर्ण आरोग्यास मदत करू शकतात. बेरी आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात आणि स्मूदी किंवा स्नॅक्समध्ये देखील खाल्ल्या जाऊ शकतात.
पालेभाज्या देखील अँटी-इंफ्लेमेटरी डाएटचा भाग आहेत. यात पालक, केल, सॅल्मन, बांगडे, हळद आणि अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडेंट संयुगे असतात, जी जळजळ कमी करण्यास प्रभावी ठरतात. पालेभाज्या कोशिंबीरमध्ये देखील खाल्ल्या जाऊ शकतात. त्याच वेळी, मासे ग्रील किंवा बेक केले जाऊ शकतात. तर, कढी किंवा सूपमध्ये हळदीचा समावेश करता येतो. त्याचबरोबर अक्रोड दही किंवा ओटमीलसोबत सर्व्ह करून खाल्ले जाऊ शकते.