Sabudana Making Process: 'या' झाडाच्या लगद्यापासून बनतो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? ९९ टक्के लोकांनां माहितीच नाही-sabudana making process sabudana is an important in fasting what tree is it made from ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sabudana Making Process: 'या' झाडाच्या लगद्यापासून बनतो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? ९९ टक्के लोकांनां माहितीच नाही

Sabudana Making Process: 'या' झाडाच्या लगद्यापासून बनतो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? ९९ टक्के लोकांनां माहितीच नाही

Aug 16, 2024 11:06 AM IST

Sabudana Making Process: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये साबुदाण्याला प्रचंड महत्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणार हा पांढराशुभ्र साबुदाणा कसा तयार होतो

कसा तयार होतो पांढराशुभ्र साबुदाणा
कसा तयार होतो पांढराशुभ्र साबुदाणा

Process of making Sabudana: उपवासाच्या वेळी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साबुदाणा हा महत्वाचा पदार्थ असतो. बहुतांश लोक उपवास नसतानासुद्धा साबुदाणा खाणे पसंत करतात. साबुदाण्याचे गोडापासून तिखटापर्यंत विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. काही लोक त्यांच्या दैनंदिन भोजनामध्ये याचा समावेश करतात. अर्थातच भारतीय खाद्यपदार्थांमध्ये साबुदाण्याला प्रचंड महत्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणार हा पांढराशुभ्र साबुदाणा कसा तयार होतो? ते बनवण्याची नेमकी पद्धत काय? आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती देणार आहोत.

'या' झाडाच्या लगद्यापासून साबुदाणा तयार होतो-

बहुतांश लोकांचा असा समज आहे की, साबुदाणा एखाद्या धान्यापासून तयार होतो. परंतु असे अजिबात नाही. साबुदाणा कोणत्याही धान्यापासून बनत नाही. तर साबुदाणा 'पाम' नावाच्या झाडाच्या देठाच्या लगद्यापासून बनवला जातो. पाम हे एक खजुरासारखे झाड आहे. ही वनस्पती मूळची पूर्व आफ्रिकेची आहे. या झाडाचे खोड जाड झाल्यानंतर त्याचा मधला भुसभुशीत भाग काढून त्याची भुकटी बनवतात. यानंतर, ही पावडर फिल्टर केली जाते आणि गरम केली जाते जेणेकरून दाणे तयार होतील. साबुदाणा तयार करण्यासाठी एकमेव कच्चा माल म्हणजे ‘टॅपिओका रूट’ जो आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कसावा’ म्हणून ओळखला जातो. कसावा स्टार्चला टॅपिओका म्हणतात.

साबुदाणा बनवण्याची प्रोसेस-

भारतात साबुदाणा टॅपिओका स्टार्चपासून बनवला जातो. टॅपिओका स्टार्च तयार करण्यासाठी, कसावा नावाचा कंद वापरला जातो. जो रताळ्यासारखाच असतो. हा लगदा मोठ्या भांड्यात काढून आठ-दहा दिवस ठेवला जातो. आणि त्यात रोज नवीन पाणी टाकले जाते. ही प्रक्रिया ४ ते ६ महिन्यांसाठी वारंवार पुनरावृत्ती केली जाते. त्यानंतर तयार झालेला लगदा बाहेर काढून मशीनमध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा मिळतो. वाळल्यानंतर, ग्लुकोज आणि स्टार्चची पावडर घालून पॉलिश केली जाते. आणि अशा प्रकारे पांढरा मोत्यासारखा साबुदाणा बाजारात येण्यासाठी तयार होतो.

साबुदाण्याचे गुणधर्म-

त्यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळते आणि काही प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे उपवासाच्या काळात यापासून बनवलेल्या वस्तू खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यातून खिचडी, खीर, चाट इत्यादी झटपट पाककृती बनवल्या जातात.

साबुदाण्याचे फायदे-

साबुदाणा कमकुवत हाडे मजबूत करण्याचे काम करते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते आणि साबुदाणामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. साबुदाणामध्ये मॅग्नेशियमचे चांगले प्रमाणदेखील आढळते. जे आपल्या हाडांना ढिसूळ होण्यापासून वाचवते.जर तुम्ही सकाळी साबुदाणा खाल्ला तर तुम्हाला दिवसभर सक्रिय वाटते आणि तुमचे शरीर निरोगी राहते. साबुदाणा खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. प्रथिने भरपूर असल्याने साबुदाणा स्नायूंच्या विकासासाठी खूप मदत करतो. पोटाच्या कोणत्याही समस्या असल्यास साबुदाणा खाणे खूप फायदेशीर ठरते. हे पचन सुधारते आणि गॅस, अपचन इत्यादी समस्यांमध्ये देखील आराम देते.

 

विभाग