Skin and Hair Care With Rose Petals: आज देशभरात रोझ डे साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन वीकचा हा पहिला दिवस प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप खास आहे. या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. जर तुमचा जोडीदार तुम्हाला दररोज भरपूर गुलाब भेट देत असेल आणि तुम्ही हे फूलं सुकल्यावर फेकून देत असाल तर यावेळी अशी चूक करू नका. केसगळतीची समस्या दूर करण्यापासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता. गुलाबामध्ये असलेल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे तो शतकानुशतके ब्युटी रेजिमचा एक भाग आहे. स्किन केअर आणि हेअर केअरसाठी गुलाबाच्या पाकळ्या कशा वापराव्या आणि त्याचे फायदे येथे जाणून घ्या.
गुलाबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते. तुरट गुणधर्म असलेले गुलाब टाळूवर अतिरिक्त तेलाची निर्मिती रोखून केस मजबूत करू शकतात. डोक्यातील कोंडा आणि असंतुलित टाळूमुळे होणाऱ्या केसांच्या इतर समस्या दूर करू शकतात.
गुलाबामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. हे जळजळ टाळण्यास मदत करू शकते. गुलाबामध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूतून एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या समस्या दूर करण्यात मदत करतात. गुलाबापासून बनवलेले गुलाब जल देखील टाळूचे तेल उत्पादन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोरडेपणा दूर करण्यासोबतच कोंडा आणि केस गळतीपासूनही आराम मिळतो आणि केस मजबूत होतात.
गुलाबामध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूला निरोगी बनवतात. ज्यामुळे केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.
केसगळतीसह कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी बारीक केलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने केसांची वाढ चांगली होऊ लागते.
गुलाबाच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेच्या ऊतींची दुरुस्ती आणि पुनर्जन्म करण्यास मदत करतात. हे अर्ली एजिंग साइन, फाइन लाइन्स, सुरकुत्या आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळते.
गुलाबामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यातील हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी गुलाब तेलाचा वापर केला जाऊ शकतो.
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. हे त्वचेला कोलेजन नावाचे प्रोटीन तयार करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग सुधारून डाग आणि हायपरपिग्मेंटेशन सारख्या समस्या दूर करण्यात मदत करू शकते.
रोझ फेशिअल ऑइल बनवण्यासाठी प्रथम १० ते १५ गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून घ्या. त्यात ७ चमचे बदामाचे तेल टाका आणि १० दिवस उन्हात ठेवा. यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या