Coconut Rose Ladoo Recipe: लव्ह बर्ड्सची प्रतीक्षा संपली असून, रोझ डेने व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनर फूडी असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत तुमचा रोझ डे खास आणि चविष्ट बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुमच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी टेस्टी कोकोनट रोझ लाडूची ही रेसिपी ट्राय करा. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे कोकोनट रोझ लाडू
- १/२ कप सुके खोबरे
- १/२ कप कंडेन्स्ड मिल्क
- १ टेबलस्पून रोझ सिरप
- २ टेबलस्पून गुलाब जल
- २ चमचे तूप
- १/२ कप बारीक केलेले मिक्स्ड ड्राय फ्रूट्स
- १ मूठभर भाजलेले शेंगदाणे
- मूठभर बदाम
- गुलाबाच्या पाकळ्या
कोकोनट रोझ लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका गरम कढईत १ चमचा तूप घालून सर्व ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर त्याच कढईत १ चमचा आणखी तूप टाकून सुके खोबरे घालून चांगले भाजून घ्या. नारळ शिजल्यावर त्यात कंडेन्स्ड मिल्क, रोझ सिरप आणि गुलाब जल टाका. सतत ढवळत असताना सर्व चांगले मिक्स करा. मिश्रण चांगले शिजल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स टाका. त्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाका. तुमचे कोकोनट रोझ लाडूचे मिश्रण तयार आहे. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर याचे लाडू तयार करून घ्या. तुमचे टेस्टी कोकोनट रोझ लाडू सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या