Rose Day 2024: फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रत्येक प्रेमी व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. प्रेमाच्या खास आठवड्याची सुरुवात रोझ डेने होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक का मानले जाते? जगात इतर अनेक सुंदर फुले आहेत. ज्यांच्या चाहत्यांची संख्या सुद्धा चांगली आहे. पण जर तुम्हाला कोणाजवळ तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर फक्त लाल गुलाबचाच विचार येतो. गुलाब हे प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. ७ फेब्रुवारीला रोझ डे साजरा होत आहे. या दिनानिमित्त जाणून घ्या या फुलाबद्दलच्या काही खास गोष्टी.
यूनान आणि ग्रीक पौराणिक कथेनुसार प्रेम आणि सौंदर्याची देवी मानली जाणारी ऍफ्रोडाईट इतकी सुंदर होती की ती जिथे गेली तिथे गुलाब उमलायचे. ऍफ्रोडाईटमुळे गुलाब प्रेम आणि इच्छेचे प्रतीक मानले गेले. ग्रीक देव ॲडोनिसशी संबंधित पौराणिक मान्यतेनुसार, ॲडोनिसला शिकार करताना एका रानडुकराने मारले आणि त्याच्या रक्ताचे डाग शेजारी उगवलेल्या पांढऱ्या गुलाबाच्या फुलांना लागले. त्यानंतर लाल गुलाबाला त्याग आणि उत्कटतेचे प्रतीक मानले जाऊ लागले.
रोमनमध्ये गुलाबाला त्याच्या सुगंध आणि विविधतेमुळे प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जात असे. पुढे हे जगभर पसरले. लोकांनी गिफ्ट म्हणून गुलाब देऊन आपले प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यास सुरुवात केली. म्हणूनच जेव्हा प्रेमाचा आठवडा सुरू होतो, तेव्हा पहिला दिवस प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाला समर्पित केला जातो आणि रोझ डे साजरा केला जातो.
लाल गुलाब - प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक
पांढरा गुलाब - शांतता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक
पिवळा गुलाब - मैत्रीचे प्रतीक
पिंक गुलाब - धन्यवाद, थँक्यू म्हणण्याचे प्रतीक
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)