The Most Beautiful Roads In India: लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विमान किंवा रेल्वेने जाण्यास प्राधान्य दिले जाते. पण रोड ट्रिपची स्वतःची एक वेगळीच मजा असते. जर तुम्हाला रोड ट्रिपला जायला आवडत असेल तर आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगत आहोत जेथील रस्ते तुम्हाला भारतातील नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून देतात. जाणून घ्या हे महामार्ग कोणते आहेत, जिथून तुम्हाला सर्वात सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
मनाली-लेह महामार्ग हा असा रस्ता आहे जो तुम्हाला प्रचंड आनंद देईल. हा 479 किलोमीटरचा रस्ता वर्षातून केवळ 3-4 महिने लोकांसाठी खुला असतो. कारण या ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होत असते, त्यामुळे हा रस्ता वर्षातून ६.. ७ महिने बंद राहतो. परंतु रस्ता प्रवासासाठी खुला झाल्यानंतर याठिकाणी अनेक लोक रोड ट्रिपचा आनंद घेण्यासाठी येतात.
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला बेंगळुरू ते उटी हा महामार्ग अतिशय आवडेल. हा सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. या रस्त्यांच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई आणि उंच झाडे असल्याने भारतातील सर्वात सुंदर महामार्गांच्या यादीत त्याचा समावेश होतो.
देशातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक, शिलाँग-चेरापुंजी महामार्ग वर्षभर धुक्याने व्यापलेला असतो. या दीड तासाच्या रोड ट्रिपमध्ये तुम्हाला खूप मजा येईल आणि सुंदर दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील.
तुम्हीही महाराष्ट्रात राहत असाल तर मुंबई ते गोवा महामार्गावर रोड ट्रिपला एकदा तरी नक्की जा. मुंबई गोवा महामार्ग हा भारतातील सर्वात सुंदर महामार्गांपैकी एक आहे. या सुंदर हायवेवरून जाताना तुम्हाला खूप सुंदर दृश्ये दिसतील.
गुवाहाटी ते तवांगला जोडणारा हा रस्ता ईशान्येला आहे, ज्याला भारताचे नंदनवन म्हणतात. हा महामार्ग अरुणाचल प्रदेशमध्ये आहे जेथे भारतीय आणि परदेशी नागरिकांना प्रवास करण्यासाठी इनर लाइन परमिट घ्यावे लागते. सर्वात सुंदर दृश्ये पाहण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
संबंधित बातम्या