Richest Religion in The World : तुम्ही जगभरातील श्रीमंत लोकांच्या अनेक प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. त्यांची संपत्ती किती आहे, हेही तुम्हाला माहिती असेल. पण जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक श्रीमंत आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत का?
गेल्या काही काळासाठी बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते, परंतु आता टेस्लाचे मालक एलोन मस्क हे जगातील नंबर वन श्रीमंत व्यक्ती आहेत.
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक संपत्ती ख्रिश्चनांकडे आहे. यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर जगाच्या संपत्तीचा मोठा हिस्सा कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडेही आहे.
न्यू वर्ल्ड वेल्थच्या रिपोर्टनुसार, धर्माच्या आधारावर, 'हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स' या (एक मिलियन अमेरिकन डॉलर्स किंवा त्याहून अधिक) यादीत ख्रिश्चनांचे वर्चस्व आहे. यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंचा क्रमांक लागतो.
यातील रिपोर्टनुसार, ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडे १०७,२८० अब्ज डॉलरची संपत्ती आहे, जी जगातील एकूण संपत्तीच्या ५५ टक्के आहे.
ख्रिश्चन नंतर मुस्लिमांचा क्रमांक येतो. जगभरातील मुस्लिम समुदायाच्या लोकांकडे ११,३३५ बिलियन अमेरिकन डॉलर संपत्ती आहे, जी जगातील एकूण संपत्तीच्या ५.९ टक्के आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हिंदू धर्माचे लोक आहेत. हिंदू धर्माच्या लोकांची संपत्ती ६,५०५ बिलियन अमेरिकन डॉलर (३.३ टक्के) आहे.
तर ज्यू धर्माच्या लोकांकडे एकूण संपत्ती २,०७९ बिलियन अमेरिकन डॉलर आहे, जी १.१ टक्के आहे.
जगातील १० श्रीमंत देशांपैकी ७ देश ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. त्याच वेळी, जगाच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग (६७,८३२ अब्ज अमेरिकन डॉलर्स) कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडे आहे. हे एकूण मालमत्तेच्या ३४.८ टक्के आहे.
संबंधित बातम्या