Rice Appe Recipe: रात्रीचा भात उरलाय? चिंता नको! भातापासून बनवा चविष्ट आप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rice Appe Recipe: रात्रीचा भात उरलाय? चिंता नको! भातापासून बनवा चविष्ट आप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

Rice Appe Recipe: रात्रीचा भात उरलाय? चिंता नको! भातापासून बनवा चविष्ट आप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

Jul 27, 2024 02:35 PM IST

Leftover Rice Appe Recipe: उरलेला तांदूळ अप्पे रेसिपी : राईस अप्पे बनवण्यासाठी तुम्ही रात्रीच्या उरलेल्या भातासोबत चिरलेल्या भाज्या वापरू शकता. तांदूळ अप्पे ची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते.

Leftover Rice -उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्याची रेसिपी
Leftover Rice -उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्याची रेसिपी

Leftover Rice Appe Recipe: स्त्रियांना रोजच्या आयुष्यात पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे आज नाष्ट्यात किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं? महिला वेळातून वेळ काढून नवनव्या रेसिपी शोधत असतात. त्या रेसिपी आपल्या स्वयंपाकघरात प्रत्यक्षात करूनसुद्धा पाहात असतात. कुकिंगची आवड अशा लोकांसाठी झटपट बनणाऱ्या रेसिपी फारच उपयुक्त ठरतात. सध्या अनेक झटपट रेसिपी आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात.

दरम्यान आता मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळेतील टिफिनमध्ये आज काय बनवायचे जे झटपट बनवण्याबरोबरच हेल्दी आणि टेस्टी असेल. तर तुम्ही राईस आप्पेची ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता. हे आप्पे बनवण्यासाठी तुम्ही रात्री उरलेल्या भातासोबत ताज्या चिरलेल्या भाज्या वापरू शकता. उरलेल्या भातापासून बनवलेल्या आप्प्यांची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ही रेसिपी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता. तर आणखी वेळ न घालवता जाणून घेऊया तांदळाचे आप्पे कसे बनवले जातात.

 

उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

शिल्लक राहिलेला भात १/२ वाटी

दही- २ मोठे चमचे

हिरव्या मिरच्या- ६

कडिपत्याची पाने- ६ ते ८

धने- ३ टेबलस्पून

पाणी- ३ मोठे चमचे

रवा- २ टेबलस्पून

टोमॅटो- २

कोबी-२ चमचे

गाजर-२ चमचे

शिमला मिरची-२ चमचे

मीठ- चवीनुसार

चवीनुसार-१/२ टीस्पून चाट मसाला

उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्याची रेसिपी

बऱ्याचवेळा आपल्याकडून गरजेपेक्षा जास्त स्वयंपाक बनतो. किंवा काही कारणास्तव तो शिल्लक राहतो. अशावेळी हे पदार्थ तसेच बोरिंग पद्धतीने न खाता किंवा विनाकारण अन्न फेकून न देता. त्यापासून झटपट अशा टेस्टी रेसिपी बनवता येऊ शकतात. आज आपण अशीच एक शिळ्या भातापासून बनवायची रेसिपी पाहणार आहोत.

उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेले शिळे भात, दही, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडे से पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको.त्यांची कन्सिस्टंसी अगदी समान असावी. आता एका बाऊलमध्ये हे पीठ काढून घ्यावे. त्यामध्ये थोडासा रवा घालून मिक्स करावे. नंतर त्यात चिरलेल्या भाज्या, कोबी, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मीठ आणि चाट मसाला घालून सर्व काही चांगले एकजीव करून जाड पीठ तयार करावे. यानंतर आप्प्यांचा तवा गरम करून तेलाने पुसून घ्यावा. त्यावर थोडे तेल लावून त्यात आप्पे पीठ घालून झाकून मंद आचेवर शिजू द्यावे. आप्पे एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने झाकून मंद आचेवर शिजू द्या. अशाप्रकारे तुमचे चविष्ट आणि खुसखुशीत आप्पे तयार होतील. तयार झाल्यानंतर त्याला खोबऱ्याची चटणी, पुदिना किंवा कोथिंबीरची हिरवी चटणी किंवा टोमॅटी सॉस सोबत खायला द्यावे.

Whats_app_banner