मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rheumatoid Arthritis Awareness Day 2024: संधिवाताच्या रुग्णांनी आहारात या पदार्थांचा समावेश करावा!

Rheumatoid Arthritis Awareness Day 2024: संधिवाताच्या रुग्णांनी आहारात या पदार्थांचा समावेश करावा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 02, 2024 11:45 AM IST

Fitness Tips: लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी संधिवात संधिवात जागरूकता दिवस साजरा केला जातो. या आजारातबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Rheumatoid Arthritis Awareness Day, observed annually on February 2.
Rheumatoid Arthritis Awareness Day, observed annually on February 2. (Unsplash)

Health Care: बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण शहरी लोकं अनेक आजारांना बळी पडतो. यापैकी एक आजार म्हणजे संधिवात. हा आजार आधी वयाने मोठे असल्यानं होत असे. पण आजकाल हा आजार सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना हाडे आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो. या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. नाही तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. संधिवात जागरूकता दिवस दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी लोकांना या आजाराविषयी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. आज आपण जाणून घेऊयात की संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

ड्राय फ्रुट्स

ड्राय फ्रुट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते. संधिवाताचे रुग्ण त्यांच्या आहारात बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकतात.

Fat loss: चरबी कमी करण्यास मदत करणारे जीवनशैलीतील ५ बदल जाणून घ्या!

हळद

हळद किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हळद तुम्ही दुधात मिक्स करून सेवन करू शकता.

Heart Health: आनंदी, निरोगी हृदयासाठी दैनंदिन आहार आणि जीवनशैलीत करा हे बदल!

धान्य खा

तुम्हालाही ही समस्या असल्यास आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करू शकता. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

> मीठ जास्त प्रमाणात सेवन करू नका.

> गोड पदार्थ खाणे टाळावे.

> दारूचे सेवन करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel