Simple Remedies for Rheumatoid Arthritis: आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. प्रत्येक नवीन पिढी यात एक पाऊल पुढे टाकत आहे. परिणामी लोक कमी वयातच संधिवाताचे बळी ठरत आहेत. रूमेटॉइड आर्थरायटिस (RA) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, जी जीवाणू आणि विषाणूंशी लढते, चुकून तुमच्या सांध्यावर हल्ला करते. यामध्ये सांधेदुखी, सूज, सांधे जड होणे इत्यादी तक्रारी येतात आणि आपले जीवन कष्टमय होऊन जाते. रूमेटॉइड आर्थरायटिस प्रकारच्या संधिवातमुळे बहुतेक लोकांना गुडघे, नितंब आणि हात दुखतात. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की वयाच्या ४० वर्षांनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सांधेदुखीची समस्या अधिक वाढते. साधारणपणे डॉक्टर सांधेदुखीसाठी पेन किलर किंवा मानसिक परिणाम करणारे असे डोस देतात. पण सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून देखील आराम मिळवू शकता.
रूमेटॉइड आर्थरायटिसमुळे आपल्या सांध्यांच्या अस्तरांना नुकसान होते. यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीराच्या ऊतींवर हल्ला करते. सांध्यांचे थर खराब झाल्यामुळे सांध्यांमध्ये दुखणे, सूज येणे यासारख्या समस्या उद्भवतात. या आजारात सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये जडपणा जाणवतो, जो एक-दोन तासांत आपोआप कमी होतो. यामध्ये सांध्यांना सूज आणि वेदना होतात.
सांधेदुखीमध्ये दूध आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे सेवन करा. याशिवाय मोसमी, संत्री, अननस, किवी, लिंबू, बेरी यासारखे व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचे सेवन करा. लसूण, आले, हळद, ब्रोकोली, ब्लॅकबेरी, पालक, टोमॅटो, भोपळा इत्यादींचाही सांधेदुखीवर फायदा होतो. संधिवात झाल्यास बीन्स, नट्स, कॉड लिव्हर ऑइल, मासे यांचे सेवन करावे. ज्या पदार्थांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते ते जास्त प्रमाणात खावे.
हा संधिवात आयुष्यभराचा आजार असला तरी तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकत नाही. पण काही उपाय करून या आजारापासून आराम मिळू शकतो. काही उपायांचा अवलंब करून आपण सांधेदुखीच्या तीव्र वेदनाही कमी करू शकतो.
- वजन कमी करणे. जर तुमचे वजन वाढले तर सांधेदुखीची समस्या अधिक त्रासाचे कारण बनू शकते.
- व्यायाम करणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरात हालचाल होईल. ज्यामुळे सांध्यांचे कार्य सुधारू शकते. मात्र अनेक प्रकारचे व्यायामही रुग्णांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा.
- रूमेटॉइड आर्थरायटिस सामान्यतः औषधोपचाराने नियंत्रित केला जातो. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे किंवा बंद करणे आवश्यक आहे, अन्यथा त्रास वाढू शकतो. याशिवाय काही उपाय करता येतात.
ही चिनी उपचार पद्धतीची प्रसिद्ध पद्धत आहे. एक्यूपंक्चरमध्ये नसा, स्नायू आणि संयोजी ऊतकांवर परिणाम करण्यासाठी तुमच्या शरीराच्या काही भागांमध्ये सुया घातल्या जातात. या पद्धतीमुळे सांधेदुखीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो. सांधे, घसा, दात इत्यादी दुखण्यांमध्ये हे तंत्र खूप उपयुक्त आहे.
मसाज हा सर्व प्रकारच्या सांधेदुखी आणि ताणापासून आराम मिळवण्याचा एक सोपा उपाय आहे. तथापि आर्थरायटिस फाउंडेशनचे असेही मत आहे की जर तुमचे सांधे खूप कमकुवत आणि कोमल असतील तर तुम्ही मसाजपासून दूर राहावे.
एक पौंड वजन कमी केल्याने तुमच्या सुजलेल्या आणि दुखणाऱ्या सांध्यावरील चार पौंड दाब कमी होतो. त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर नियंत्रित आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या.
'Tai Chi' हा वेदना कमी करण्याचा आणखी एक चायनीज मार्ग आहे. यात हलक्या हलक्या हालचाली, दीर्घ श्वास आणि ध्यान यांचा वापर केला जातो, ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर याच्या मदतीने तुम्ही चांगली हालचाल करू शकता आणि इतर कामेही करू शकता.
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिडशी लढणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच आठवड्यातून दोनदा सुमारे १०० ग्रॅम मासे खाणे तुमच्या वेदनांसाठी चांगले आहे. यासाठी तुम्ही सॅल्मन, ट्यूना, मॅकेरल आणि हेरिंग फिश निवडू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)