तुमच्या घरात कुणी स्पेशल गेस्ट येणार येणार असतील किंवा पार्टी असेल तर अनेकदा प्रश्न प्रडतो की, स्टार्टरमध्ये काय बनवायचे. अशा स्थितीत तुमच्या या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला चिकनची आवड असेल तर तुम्ही स्टार्टरमध्ये ड्रॅगन चिकन बनवू शकता. ड्रॅगन चिकन हे अगदी कमी वेळात बनणारी डीश असून ती बनवायलाही तितकीच सोपी आहे.
अशा स्थितीत आपण ड्रॅगन चिकन बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
चिकन बोनलेस
मीठ
अजिनोमोटो
काळी मिरी पावडर
सोया सॉस
एक चमचा व्हिनेगर
एक चमचा कॉर्नफ्लोर
तेल
संपूर्ण लाल मिरची
कांदा
बारीक चिरलेला लसूण
लिंबाचा रस
स्प्रिंग कांदा
- प्रथम बोनलेस चिकनचे लहान तुकडे करा.
- नंतर त्यावर चिमूटभर मीठ, अजिनोमोटो घाला.
- काळी मिरी, सोया सॉस आणि व्हिनेगर घाला.
- १ चमचा कॉर्नफ्लोर घालून सर्व काही नीट मिक्स करा.
- आता हे चिकन नीट तोलात तळून घ्या. तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्यू पेपर शोषून घेतील.
- आता कढईत तेल टाका.
- सात ते आठ सुक्या लाल मिरच्या टाका. लाल मिरच्या तळून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका.
- चांगले भाजल्यानंतर आले आणि लसूण बारीक चिरून घाला. तेही तळून घ्या आणि शेवटी स्प्रिंग कांदा घाला.
- त्यात चिरलेले भाजलेले शेंगदाणे आणि थोडी उडीद डाळ भाजून घाला.
- यानंतर त्यात तळलेले चिकन लिंबाचा रस आणि सोया सॉस टाका. काही वेळ फ्राय केल्यावर तुमचे ड्रॅगन चिकन तयार होईल.