मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tiranga Khandvi: प्रजासत्ताक दिनाला बनवा तिरंगा खांडवी, नोट करा ही टेस्टी रेसिपी

Tiranga Khandvi: प्रजासत्ताक दिनाला बनवा तिरंगा खांडवी, नोट करा ही टेस्टी रेसिपी

Jan 25, 2024 05:39 PM IST

Republic Day Special Recipe: प्रजासत्ताक दिनाला काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने तिरंगा खांडवीची ही रेसिपी बनवू शकता.

तिरंगा खांडवी
तिरंगा खांडवी

Tiranga Khandvi Recipe: प्रजासत्ताक दिन अवघ्या एक दिवसावर आला आहे. देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वत्र उत्साहात तयारी सुरु आहे. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी अनेक लोक घरी विविध तिरंगी पदार्थ बनवतात. तुम्ही सुद्धा असाच काही विचार करत असाल तर तुम्ही तिरंगा खांडवी बनवू शकता. सकाळचा नाश्ता असो वा स्नॅक्स टाईम तुम्ही हे कधीही बनवू शकता. देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिरंगा खांडवीची ही रेसिपी कशी बनवायची ते पाहा.

ट्रेंडिंग न्यूज

तिरंगा खांडवी बनवण्यासाठी साहित्य

- ३ कप तांदळाचे पीठ

- २ चमचे आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट

- १/२ कप दही

- १/४ टीस्पून तेल (ग्रीसिंगसाठी)

- १ टेबलस्पून तेल

- १/२ टेबलस्पून जिरे

- १/२ टीस्पून तीळाचे तेल

- कढीपत्ता

- चवीनुसार मीठ

तिरंगी खांडवी सजवण्यासाठी

- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

- २ चमचे ताजे किसलेले खोबरे

केशरी रंगाची खांडवी बनवण्यासाठी

- २ टेबलस्पून तेल

- १/४ टीस्पून जिरे

- १ टीस्पून आल्याची पेस्ट

- १/४ कप टोमॅटो आणि काश्मिरी मिरचीची प्युरी

- १/२ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून लाल तिखट

- १ चमचा लाल मिरचीची पेस्ट

- चवीनुसार मीठ

पांढऱ्या रंगाची खांडवी बनवण्यासाठी

- तांदळाचे पीठ

- २ टेबलस्पून तेल

- १/४ चमचे जिरे

- १ टीस्पून आल्याची पेस्ट

- चवीनुसार मीठ

हिरव्या रंगाची खांडवी बनवण्यासाठी

- २ टेबलस्पून तेल

- १/४ टीस्पून जिरे

- १ टीस्पून आले पेस्ट

- १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट

- १/२ कप पालक

- चवीनुसार मीठ

तिरंगा खांडवी बनवण्याची पद्धत

तिरंगा खांडवी बनवण्यासाठी प्रथम एका खोल नॉन-स्टिक पॅनमध्ये तांदळाचे पीठ, आले-हिरवी मिरची पेस्ट, सैंधव मीठ, दही आणि दीड कप पाणी घालून चांगले मिक्स करा. यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. आता हे मिश्रण मंद आचेवर सुमारे १० मिनिटे शिजवा आणि घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा. आता चमच्याच्या मदतीने ग्रीस केलेल्या प्लेटच्या विरुद्ध बाजूस पिठ पसरवा आणि काही सेकंद थांबा. नंतर ते रोल करण्याचा प्रयत्न करा. तसे न झाल्यास आणखी काही मिनिटे शिजवा आणि पुन्हा रोल करण्याचा प्रयत्न करा.

या पिठाचे तीन समान भाग करा. केशरी आणि हिरव्या रंगाची खांडवी बनवण्यासाठी त्यात ते साहित्य टाका. मिश्रण गरम असतानाच स्पॅटुला वापरून दोन ग्रीस केलेल्या प्लेट्सच्या विरुद्ध बाजूंनी प्रत्येक भाग समान रीतीने पसरवा. मिश्रण थंड झाल्यावर प्रत्येक प्लेटवर २ इंच अंतरावर लांबीच्या दिशेने कट करा आणि प्रत्येक प्लेट हलक्या हाताने फिरवा. खांडवी सर्व्हिंग प्लेटवर ठेवा. आता तडका तयार करण्यासाठी एका छोट्या, नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात तीळ आणि कढीपत्ता घालून मध्यम आचेवर काही सेकंद होऊ घ्या. हा तडका खांडवीवर घाला आणि तिरंगा खांडवीला नारळ आणि कोथिंबीरने सजवा.

WhatsApp channel
विभाग