26th January 2024: आपल्या देशात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली, तेव्हापासून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात भारतीय संविधान लागू होऊन यंदा ७४ वर्षे पूर्ण होत असून यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या दिवशी वेगवगेळे कार्यक्रम केले जातात. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सरकारी केंद्रे, ऑफिस तसेच सोसायट्या इत्यादींमध्ये हा दिवस वेगवगेळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक वयोगटातील लोक यात उत्साहाने सहभागी होतात. यानिमित्ताने भाषणही केले जाते. जर तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त अधिक चांगले भाषण तयार करायचे असेल, तर हा आम्ही तुमची मदत करणार आहोत. भाषणाची तयारी करताना कोणत्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे याबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्ही भाषणाची तयारी करत असाल तर प्रथम सर्वांना शुभेच्छा द्या. जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये भाषण देत असाल तर भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या.
सगळ्यांना अभिवादन केल्यानंतर, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनावर प्रकाश टाका. यंदा आपण कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ते सांगा. यानंतर प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगा. हा दिवस कसा तयार झाला, कोणी तयार केला आणि किती दिवसांत पूर्ण झाला यासारखी माहिती द्या. यासोबतच संविधान सभा, तिचे सदस्य आणि संविधानाचा संदर्भ घेऊन कोणत्या देशांची राज्यघटना तयार करण्यात आली याची माहिती देऊ शकता.
भाषणादरम्यान तुम्ही त्या काळासाठी योग्य वाटणाऱ्या कविता आणि शायरी आवर्जून ऍड करा. यामुळे तुमच्या बोलण्यात रस वाढेल आणि लोक तुमचं भाषणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकतील.
भाषणाच्या शेवटी, सर्व पाहुणे, शिक्षक आणि उपस्थित सर्वांचे आभार माना. शेवटी, आभार व्यक्त करताना कविता किंवा चारोळी बोला. यामुळे भाषणाचा शेवट आणखीन छान होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या