मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Republic Day Decor: प्रजासत्ताक दिनाला घरात निर्माण करा देशभक्तीचा उत्साव, उपयोगी पडतील या डेकोरेशन आयडिया

Republic Day Decor: प्रजासत्ताक दिनाला घरात निर्माण करा देशभक्तीचा उत्साव, उपयोगी पडतील या डेकोरेशन आयडिया

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 24, 2024 09:38 PM IST

Decoration Ideas: प्रजासत्ताक दिन जवळ येताच सर्वत्र देशभक्ती संचारते. तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी हाच उत्साह निर्माण करायचा असेल तर या काही क्रिएटिव्ह डेकोरेशन आयडियाची मदत घेऊ शकता.

प्रजासत्ताक दिनानिमित्त होम डेकोरेशन आयडिया
प्रजासत्ताक दिनानिमित्त होम डेकोरेशन आयडिया (HT)

Creative Decor Ideas For Republic Day: २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारी परेड आणि उत्सवांसह साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या आनंदाच्या निमित्ताने आपण आपल्या देशप्रेमाला आपल्या घरात सुद्धा निर्माण करू शकतो. सांस्कृतिक सौंदर्यशास्त्र, व्हायब्रंट फर्निचर आणि कोझी टेक्सटाईल्स यांच्या मिश्रणाने आपले घर सजवू शकता. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला घर सजवण्यासाठी या काही क्रिएटिव्ह होम डेकोरेशन आयडिया पाहा.

ट्रायकलर कुशन्स

प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गोष्ट भारतीय राष्ट्रध्वजाचे रंगात रंगलेली असते. मग घर का सोडायचं? दरवर्षी संपूर्ण खोली पुन्हा सजवणे कठिण असले तरी पांढऱ्या, हिरव्या आणि केशरी रंगात कुशनने तुम्ही राष्ट्रीय रंगांवरील आपले प्रेम दर्शवू शकता. फेस्टिव्ह आणि देशभक्तीपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी आपल्या मास्टर बेडरूममध्ये पांढरी उशी, हिरवी झाडे आणि केशर बेड लिनन वापरा.

फुलांची सजावट

फुले कोणाला आवडत नाहीत? त्यांच्या मोहक सुगंध आणि चैतन्यपूर्ण रंगांमुळे ते लगेच उत्सवाचा मूड तयार करू शकतात. तिरंगा लुकसाठी झेंडू, चमेली आणि हिरव्या पानांचा वापर करा आणि या तीन रंगात अरेंजमेंट पूर्ण करा. फुलांची रांगोळी काढली किंवा फुलांनी तिरंगा झेंडा तयार केला, तर तुमचं घर या दिवसासाठी नक्कीच सज्ज असेल.

कागदी फुलांची सजावट

जर तुम्हाला हस्तकलेची आवड असेल तर रंगीत क्रेप पेपर, डिंक आणि वायरने कागदी गुलाब बनवण्याचा प्रयत्न करा. घर सजवण्यासाठी या कागदी फुलांचा वापर करा. आपण आपल्या खिडकीत लटकवण्यासाठी फुलांचे वेल बनवू शकता किंवा फुलदाणीमध्ये पुष्पगुच्छ म्हणून वापरू शकता. टेम्पलेटचा वापर करून रंगीत कार्डमधून फुलांचे आकार कापून घ्या. आपल्या क्रिएटिव्हिटीचा वापर करा. तुम्ही स्टार, हार्ट किंवा लहान बाहुल्यांच्या आकारात कट-आऊट देखील बनवू शकता. या सुंदर आकारांचा वापर हार, पोस्टर्स आणि बॅनर बनविण्यासाठी करा.

तिरंगी फुगे

तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये प्रजासत्ताक दिनाची पार्टी आहे का? केशरी, पांढरे आणि हिरवे हीलियम फुगे तुमच्या अरेंजमेंटचा केंद्रबिंदू बनवा! तुमच्या रूमचे व्हिज्युअल सिम्फनीत रूपांतर करण्यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवी फुगे यांची अरेंजमेंट करून आनंदी वातावरण तयार करा. एखादा कोपरा, भिंती आणि छतांना फुग्याचे क्लस्टर आणि हारांनी सजवा. यासोबतच तुम्ही झेंड्याचा वापर करू शकता.

 

एलईडी लाइट

भारतीय ध्वजाचे इसेंस टिपण्यासाठी आणि केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची व्हायब्रंट औरा तयार करण्यासाठी आपली जागा तिरंगी एलईडी स्ट्रिंग लाइट्सने सजवा. देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी खिडक्या, दरवाजे आणि इतर पोकस पॉइंट येथे एनर्जी एफिशिएंट लाइटचा वापर करा. राष्ट्रीय चिन्हे किंवा अशोक चक्रापासून प्रेरित एलईडी लाइट पॅटर्नसह स्टाईल जोडा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel