Cooking Tips: ग्रेव्हीमध्ये दही घालताना शेफ पंकज भदोरियांनी सांगितलेल्या या ३ टिप्स लक्षात ठेवा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: ग्रेव्हीमध्ये दही घालताना शेफ पंकज भदोरियांनी सांगितलेल्या या ३ टिप्स लक्षात ठेवा!

Cooking Tips: ग्रेव्हीमध्ये दही घालताना शेफ पंकज भदोरियांनी सांगितलेल्या या ३ टिप्स लक्षात ठेवा!

Aug 23, 2023 04:33 PM IST

Masterchef Pankaj Bhadouria: ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर अनेकदा ग्रेव्ही फाटते. तुम्ही स्वयंपाक करताना होत असेल तर शेफ पंकज भदोरिया यांनी दिलेल्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.

adding curd to gravy
adding curd to gravy (Freepik)

ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर बहुतेक लोकग्रेव्ही फाटण्याची तक्रार करतात. जरी ती ग्रेव्ही खाण्यासाठी सुरक्षित असली तरी त्यामुळे डिश खूपच खराब दिसते. अशा वेळी चव कितीही चांगली असली तरी ती पाहून खावंसं वाटत नाही. हे टाळण्यासाठी काय करायला हवे, हे मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे सांगितले आहे. ग्रेव्हीमध्ये घातल्यावर दही घासण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी येथे तीन सोप्या टिप्स सांगत आहोत.

टीप १

कोणत्याही ग्रेव्हीमध्ये दही घालण्यापूर्वी एका भांड्यात चांगले फेटून घ्या. यासाठी तुम्ही व्हिस्कर किंवा ग्राइंडर देखील वापरू शकता. लक्षात ठेवा की दह्याची जाडी थोडीशी पातळ होईपर्यंतच मारायचे आहे. जर तुम्ही यासाठी ग्राइंडर वापरत असाल तर लक्षात ठेवा की ते जास्त पातळ नसावे.

टीप २

जेव्हा तुम्ही ग्रेव्हीमध्ये दही घालाल तेव्हा गॅस मंद ठेवा किंवा बंद करा. यामुळे दह्याला ग्रेव्हीमध्ये सेट करण्यासाठी पुरेसे तापमान मिळते.

टीप ३

ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर ते उकळी येईपर्यंत ढवळत राहा. असे केल्याने दही विखुरलेले व फाटलेले दिसत नाही.

या टिप्स पण येतील कामी

दही घालण्यापूर्वी ग्रेव्हीमध्ये कॉर्नस्टार्च किंवा थोडे पीठ घालू शकता. हा दह्याला पर्याय आहे. तुम्ही हा पर्याय ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी देखील वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner