Remedies for drying clothes during monsoon: पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. पावसात भिजणे, प्रवास करणे, गरमगरम चहा भजी खात पावसाचा आनंद घेणे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र पावसाळ्यात जशा चांगल्या गोष्टी होतात. तशाच काहीशा त्रासदायक गोष्टीसुद्धा दिसून येतात. यामध्ये घरातील स्त्रियांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण पावसाळ्यात धुतलेले कपडेच वाळत नाहीत. आणि विविध प्रयत्न करून जरी कपडे वाळले तरी त्यातून कुबट वास यायला लागतो. अशावेळी ते कपडे घालून कॉलेज, ऑफिस किंवा शाळेमध्ये जाणे नकोसे वाटते. त्यामुळे महिला पावसाळ्यात या कारणाने अतिशय त्रस्त असतात.
पावसाळ्यात कपडे वाळवणे हा घरातील महिलांसाठी एक मोठा टास्कच असतो. पावसाळ्यात कपडे कडकडीत वाढत नाहीत. कपडे थोडेसे ओलसरच असतात. शिवाय त्यातून दुर्गंधीही येत असते. त्याचबरोबर पावसाळयात सतत ओले कपडे घातल्याने त्यावरील विषाणू शरीरावर येतात आणि त्वचेसंबंधी समस्या सुरु होतात. रॅशेस येणे, खाज उठणे, पुरळ येणे अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठीच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे कपडेही वाळतील आणि त्यातून येणारी दुर्गंधीही दूर होईल.
पावसाळ्यात कपड्यांमध्ये दुर्गंधी येत असेल तर अगदी अस्वस्थ वाटू लागते. अनेकांना असे कपडे परिधान करणेच आवडत नाही. तर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी नाईलाजाने गणवेश म्हणून ते कपडे घालून जातात. मात्र कपड्यांमध्ये येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातील एक पदार्थ अत्यंत उपयुक्त ठरतो. हा पदार्थ म्हणजे लिंबू होय. एका बादलीत पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळावा. त्या पाण्यात धुतलेले कपडे बुडवावे. काही मिनट ठेऊन ते कपडे त्या पाण्यातून बाहेर काढावे असे केल्याने कपड्यांमधून दुर्गंधी येणार नाही. कारण लिंबूमध्ये बॅक्टेरिया आणि त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी दूर करण्याची खास क्षमता आहे.
कपडे धुण्यापूर्वी एका बादलीत अर्धा कप व्हिनेगर टाकून मिक्स करावा. त्यानंतर त्यात कपडे बुडवून काढावे अशाने कपडे मऊ होतात आणि त्यातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. शिवाय कपडे धुतल्यानंतर एका बादलीत बेकिंग सोडा मिक्स करावा. या मिश्रणात कपडे काही वेळ बुडवून ठेवावे. अशाने कपड्यातील बॅक्टरीया दूर होऊन कुबट वास येणे बंद होते. त्यामुळे अनेक महिला हा उपाय करतात. पावसाळ्यात हे उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकतो.
पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्याने हवामान अगदीच थंड, दमट असते. सूर्यप्रकाशाच्या अभावाने कपडे वाळणे शक्य होत नाही. त्यामुळे कपडे वाळवण्यासाठी विविध उपाय करावे लागतात. जर तुम्ही एखाद्या खोलीत कपडे वाळवत असाल तर तुम्हाला व्हेंटिलेशनची दक्षता घ्यावी लागेल. याठिकाणी तुम्ही पंखा किंवा एसी लावून ठेवावी. जेणेकरून त्या खोलीत हवा खेळती राहील. आणि कपडे पटकन वाळण्यास मदत होईल. हवेशीर ठिकाणी कपडे वाळल्याने दुर्गंधीसुद्धा येणार नाही.
संबंधित बातम्या