Why do arguments happen in married life: नातं हे एखाद्या काचेसारखं असतं. नातं निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम, आदर, समज आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. जर या गोष्टी तुमच्या वैवाहिक आयुष्यात नसतील किंवा हळूहळू कमी होऊ लागले असतील तर, नाते तुटायला फार वेळ लागणार नाही. अलीकडचे याच कारणांमुळे घटस्फोटसारख्या गोष्टी वारंवार ऐकायला मिळत आहेत.
अनेकदा पती-पत्नीमधील भांडणाची कारणे म्हणजे विवाहबाह्य संबंध, एकमेकांवर संशय, सामाजिक दबाव, घरातील वाद, पैशांवरून वाद इत्यादी आणि इतर अनेक कारणांमुळे वैवाहिक जीवन बिघडते आणि वैवाहिक नात्यात तणाव आणि कटुता निर्माण होते. अशा परिस्थितीत, जे लोक प्रत्येक संभाषणात खूप रागावलेले, आक्रमक किंवा संशयास्पद असतात, ते अनेक वेळा अशी चुकीची पावले उचलतात, ज्याचा परिणाम खूपच वाईट होतो. संशय कोणत्याही नात्याचा नाश करतो. परिपूर्ण वैवाहिक जीवन जगण्यासाठी एकमेकांवर पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे.
१) अनेक कारणांमुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता येऊ लागते. त्यामुळे नात्यात तणाव वाढतो. पती-पत्नी ही गाडीची दोन चाके आहेत, असे म्हणतात. त्यांना आयुष्यात संतुलन राखावे लागते. जर पती-पत्नीमध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव असेल आणि दोघेही एकमेकांना पुढे जाण्यास मदत करत नसतील, तर त्यांच्या वैवाहिक आयुष्य उध्वस्त होऊ लागते.
२) अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा पती-पत्नीमधील शारीरिक अंतर वाढते. मुले, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामाचा ताण, तणाव इत्यादींमुळे लैंगिक जीवनावर परिणाम होऊ लागतो. या सर्व कारणांमुळे काही जोडप्यांचा शारीरिक संबंधांमध्ये रस कमी होतो. त्यामुळे नात्यात कटुता आणि चिडचिड वाढू लागते.
३)जर पतीची आर्थिक स्थिती मजबूत नसेल, तर हे देखील वैवाहिक आयुष्यात कटुता येण्याचे कारण असू शकते. पैशां अभावी दैनंदिन गरजाही पूर्ण होत नसल्याचे बहुतांश घरांमध्ये दिसून आले आहे. यामुळे पती पत्नीची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाही. आर्थिक विवंचनेमुळे अनेक वेळा पती कर्जात बुडतो. घरचे बजेट बिघडते. वैवाहिक जीवनात कटुता येण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
४) घरातील दैनंदिन समस्या जसे की, प्रत्येक मुद्द्यावरून सासू-सासरे वाद घालणे, नणंदसोबत सतत भांडण होणे, इत्यादींमुळे पती-पत्नीच्या नात्यात मोठ्या प्रमाणात दुरावा येऊ लागतो. प्रत्येक संभाषणात ते एकमेकांच्या कुटुंबाला टोमणे मारायला लागतात. काही कुटुंबात नवरा फक्त आईचीच बाजू घेतो, तर काही लोकांमध्ये तो आईची किंवा पत्नीची बाजू घेऊ शकत नाही. या गोंधळात तो आणखीनच चिडतो आणि हळूहळू बायकोपासून दूर जाऊ लागतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)