Healthy Relationship Tips: प्रत्येक नात्याची सुरुवात फारच सुंदर आणि हळुवार होते. मात्र काही वर्षांनंतर या नात्यामध्ये विविध बदल होतात. हे खासकरून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना उत्तम लागू होतं. काही वर्षांनंतर जोडीदारासोबत वादविवाद, मतभेद असे प्रकार घडू लागतात. अनेक जोडपी कित्येक वर्षे न बदलता जशीच्या तशी राहतात. या लोकांमध्ये सामंजस्य आणि प्रेम दोन्ही असते. मात्र काही लोकांना याचा वाईट अनुभव येतो.
बऱ्याचवेळा रिलेशनशिपमध्ये असूनसुद्धा एखादी व्यक्ती आपल्या पार्टनरची फसगत करत असते. त्यामुळे त्यांच्या नात्यातील गोडवा संपतो. लहान-लहान गोष्टींवरून वारंवार वाद होऊ लागतात. गोष्टी लपवल्या जातात. त्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाते. असे अनेक प्रकार यामध्ये घडतात. तर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खऱ्याने वागतोय का? तो तुमची फसगत तर करत नाहीय ना? आणि जर असं असेल तर त्याची नेमकी लक्षणे काय? याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुसऱ्या व्यक्तीसोबत पकडले, तर तो नक्कीच तुमच्यासमोर असा आव आणेल कि आपण पहिल्यांदाच असं काही केलंय. आपली चूक माफ करण्यासाठी भावनिक गोष्टी सांगेल. पण ही एक फसवणूक नात्यात कायमची दरी निर्माण करू शकते. आणि एकदा घडलेली चूक दुसऱ्यांदा घडणार नाही याचा काहीही नेम नसतो.
फसवणूक करणारे लोक कधीही स्वतःची चूक मान्य करत नाहीत. याउलट ते तुमच्यावर गोष्टी ढकलून रिकामे होतात. शिवाय त्यांनी केलेल्या चुकीला तुमची जबाबदार असल्याचा दिखावा करतात. अशावेळी तुम्हाला सावध राहून डोक्याने विचार करायला हवा.
आपल्याला कधी काही गोष्टींमध्ये जोडीदारावर संशय आला आणि आपण तो व्यक्त केला किंवा त्यांची चूक आपण पकडली तर ते चूक कधीच मान्य करत नाहीत. उलट आपल्या त्यांच्यावर विश्वासच नाही असा आरोप करतात. अशा गोष्टी बोलून ते आपल्याला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतात.
एखाद्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराला फसगत करताना पकडले. तर तो व्यक्ती तुम्हाला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतो. मी असं करूच शकत नाहीस आणि तू मला अजून ओळखूच शकली नाहीस अशा गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. त्यामुळे प्रेमात डोळे उघडून सर्व गोष्टींची शहानिशा करायला हवी. शिवाय नाते टिकवण्यासाठी दोन्ही जोडीदारांनी एकमेकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी.
संबंधित बातम्या