Relationship Tips: नवरा घरातील कोणत्याही कामात मदत करत नाही का? त्यामागे असू शकतात ही कारणं
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tips: नवरा घरातील कोणत्याही कामात मदत करत नाही का? त्यामागे असू शकतात ही कारणं

Relationship Tips: नवरा घरातील कोणत्याही कामात मदत करत नाही का? त्यामागे असू शकतात ही कारणं

Published Jul 17, 2024 11:27 PM IST

Relationship Tips in Marathi: तुम्हीही तुमच्या नवऱ्याकडे तक्रार करत असाल की, तो तुम्हाला घरातील कोणत्याही कामात मदत करत नाही. जाणून घ्या त्याने असे करण्यामागे कोणती कारणं दडलेली आहेत.

नवरा घरातील कामात मदत न करण्याचे कारणं
नवरा घरातील कामात मदत न करण्याचे कारणं (shutterstock)

Reasons Why Husbands Not Helping in House Chores: नवरा-बायकोमध्ये कितीही प्रेम आणि विश्वास असला तरी बहुतेक भारतीय घरांमध्ये स्त्रियांची आपल्या नवऱ्याशी तक्रार नक्कीच असते. ज्यासाठी पुरुषांना रोज बायकोकडून टोमणे नक्कीच ऐकायला मिळतात. होय, घरकामात मदत न केल्याची ही तक्रार आहे. हल्ली बहुतेक घरांमध्ये कपल्स वर्किंग असतात. अशावेळी घरातील कामे सांभाळताना पतीने पत्नीला मदत केली नाही, तर घर आणि बाहेरची दोन्ही जबाबदारी पत्नीवर येते. ज्यामुळे तिला कधी कधी चिडचिड, राग, उदास आणि थकवा जाणवू लागतो. जर तुम्हालाही तुमच्या नवऱ्याकडे तक्रार असेल की तो तुम्हाला घरातील कोणत्याही कामात मदत करत नाही, तर त्याच्याकडे तक्रार करण्यापूर्वी पतीच्या अशा करण्यामागे दडलेल्या या कारणांबद्दल नक्की जाणून घ्या.

जुनी विचारसरणी

बदलत्या काळानुसार व्यक्तीच्या विचारसरणीत बराच बदल झाला आहे. पण आजही अनेक घरांमध्ये घरकाम महिलांपुरतेच मर्यादित राहिले आहे. अशा वेळी घरातील कामे न करण्यामागे पतीची जुनी विचारसरणीही कारणीभूत ठरू शकते. घरातील भांडी घासणे, कपडे धुणे ही कामे पुरुष करत नाहीत तर स्त्रिया करतात, असा त्यांचा समज असू शकतो.

लोकांचे टोमणे

कदाचित तुमच्या पतीने यापूर्वी घरकामात मदत केल्याबद्दल घरच्यांकडून किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून टोमणे ऐकले असतील. हे टाळण्यासाठी देखील ते घरातील कामे करणे टाळतात.

बिझी असल्यामुळे

घरकाम न करण्यामागचं हे सुद्धा एक कारण असं असू शकतं की, तुमचा नवरा आधीपासूनच ऑफिस किंवा इतर कुठल्याही महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे. ज्यामुळे त्यांना घरातील कामाकडे आणि तुमच्या थकव्याकडे लक्ष देता येत नाही.

बेजबाबदार व्यक्ती

जर तुमचा नवरा वेळ आणि शक्ती असूनही घरातील कामे करण्यात मदत करत नसेल तर तो बेजबाबदार व्यक्ती असू शकतो. अशा लोकांना ना तुमची तब्येत खराब झाल्याचे काही वाटत ना घरासाठी तुमच्या वाढत्या जबाबदाऱ्यांची पर्वा असते. असे लोक आपल्या जगात मग्न असतात.

जाणिवेचा अभाव

पतीकडे मदत न मागता घरातील सर्व कामे तुम्ही स्वत:च सांभाळत असाल, तर आपल्याला त्याच्या मदतीची गरज नाही, असे त्याला वाटू शकते. घरातील सर्व कामे तुम्ही स्वत:ला दुखवून करत असाल तर त्यांना याची जाणीव करून द्या. त्यासाठी घरातील सर्व कामे आपापसात वाटून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner