मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Angry Partner: तुमचा पार्टनर पण रागीट आहे? हाताळण्यासाठी या ट्रिक्स करतील मदत

Angry Partner: तुमचा पार्टनर पण रागीट आहे? हाताळण्यासाठी या ट्रिक्स करतील मदत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2024 11:05 PM IST

Relationship Tips: अनेक वेळा तुम्ही कपलमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करताना पाहिले असेल. तुमच्या पार्टनरला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येत असेल तर या ट्रिक्स तुमची मदत करतील.

रागीट पार्टनरला हाताळण्यासाठी ट्रिक्स
रागीट पार्टनरला हाताळण्यासाठी ट्रिक्स

Tricks to Deal With Angry Partner: एखाद्या गोष्टीवर राग येणे तसे सामान्य आहे. पण जर छोट्या छोट्या गोष्टींवर एखादी व्यक्ती राग व्यक्त करत असेल तर नात्यात सतत वाद होऊ शकतात. कपलमध्ये तसे थोडेफार वाद, मतभेद सुरु असते. पण प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागला तर त्या व्यक्तीसोबत राहणे फार कठीण असते. विशेषत: अशी रागीट व्यक्ती तुमची पार्टनर असेल तर समस्या आणखी वाढते. तुमचा जोडीदारही जर रागीट असेल तर या त्याला हाताळण्यासाठी या काही ट्रिक्स तुमची मदत करतील.

रिअॅक्ट करू नका

जेव्हा पार्टनर रागवतो तेव्हा त्याच्याशी आर्ग्यु करू नका. जर तुम्ही त्यावेळी रिअॅक्ट झालात तर वाद संपण्याऐवजी आणखी वाढेल. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पहा. तुम्ही रिअॅक्ट केल्याने रागात असलेल्या पार्टनरला आणखी संधी मिळेल.

प्रेमाने उत्तर द्या

प्रेमाने राग शांत होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा पार्टनर रागात काही विचारत असेल तर त्याच्या बोलण्याला प्रेमाने उत्तर द्या. अशा परिस्थितीत जोडीदाराचा राग शांत होऊ शकतो.

पार्टनरला प्रेमाने समजवा

कुठलीही गोष्ट करण्याची एक वेळ असते. तुम्हाला देखील फक्त योग्य वेळेची वाट पहावी लागेल आणि जोडीदाराचा मूड पाहून बोलणे आवश्यक आहे. पार्टनर थोडं शांत झाल्यावर त्याच्याची प्रेमाने बोलल्याने वाद वाढणार नाही.

 

अँगर मॅनेजमेंट थेरपी

तुमचा जोडीदार बालपणात एखाद्या ट्रामामधून गेला असेल ज्यामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा झाला असेल हे देखील समजून घेतले पाहिजे. तुमचा जोडीदार स्वतः या समस्येशी झगडत असेल, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना थेरपीसाठी घेऊन जाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel