Relationship Tips: असे अनेक कपल्स असतात जे लग्नापूर्वी दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये असतात. रिलेशिपमध्ये असल्याने त्यांना एकमेकांचा स्वभाव, वागणूक कळते. पण कधी कधी लग्नानंतर काही दिवसातच नात्यात आधी असलेला ओलावा, प्रेम आता नाही असे त्यांना वाटू लागते. यामुळे नात्यात असुरक्षितता येते, वाद होऊ लागतात. तुम्हाला तुमचे नाते घट्ट ठेवायचे असतील तर आधी या ४ गोष्टींनी आपल्या नात्याची टेस्टिंग करून घ्या. यावरून तुमचे नाते कसे आहे, ते घट्ट आहे की नाही हे कळेल. जाणून घ्या या गोष्टी कोणत्या आहेत.
तुमचा जोडीदार कामाच्या व्यस्ततेतही तुमच्याशी चांगले वागतो का हे स्वतःला विचारा. नेहमी तुमचा आदर करतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल आदराची भावना आहे का? जर उत्तर हो असेल तर तुमचं नातं सहजासहजी तुटणार नाही.
प्रेम असो का लग्न दोन्ही नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास आहे का हे स्वतःला विचारा. जर उत्तर होय असेल तर काळजी करू नका. पण जर उत्तर नाही असेल तर तुम्ही तुमचे नाते मजबूत करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
पार्टनर तुमच्यासोबत खूप रोमँटिक राहत नसेल पण प्रत्येक गरजेच्या वेळी किंवा कामाच्या वेळी तो तुमच्यासोबत उभा राहत असेल तर याचा अर्थ तुमचे नाते मजबूत आहे. दोघांमध्ये चांगली समज असल्याचे हे लक्षण आहे. आपल्या पार्टनरसाठी स्टँड घेणे महत्त्वाचे असते.
कितीही भांडण झाले किंवा मतभेद झाले तरी पार्टनर जर तुमच्यापासून दूर राहू शकत नसेल तर तुम्हा दोघांमधील नाते मजबूत आहे आणि तुमचे भविष्यही सुरक्षित आहे असे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. या गोष्टीने हे स्पष्ट होते की तुमच्या नाते सहज तुटणारे नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या