दरवर्षी २३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय केळी ब्रेड दिन फळ आणि ब्रेडची परिपूर्ण जोडी साजरी करतो. भारतीयांसाठी घरात केळी फळं आवर्जून असते. केळी आणि ब्रेड हे कॉम्बिनेशन उत्तम आहे. यापासून अनेक गोड पदार्थ बनवले जातात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या स्वादिष्ट ट्रीटच्या अनेक गोड आठवणी आहेत. केळीचा ब्रेड बनवायला सोपा आणि स्वादिष्ट लागतो. ही एक लोकप्रिय पाककृती आहे आणि आरोग्यदायीसुद्धा आहे. याचा मऊ पोत आणि गोड चव यामुळे ते प्रौढ आणि लहान मुलांसाठी आवडते. पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध, केळीब्रेड आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे. हा दिवस साजरा करत असताना, येथे काही टिप्स आणि घरी परफेक्ट केळीब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
(शेफ संजीव कपूर यांची रेसिपी)
२ - मध्यम केळी
१/२ - वाटी बटर
१/ २- टीस्पून- दालचिनी पावडर
१/२ टीस्पून - व्हॅनिला एसेन्स
१/२ टीस्पून - लिंबाचा रस
१ - टीस्पून मेपल सिरप
चिमूटभर - बेकिंग सोडा
चिमूटभर - समुद्री मीठ
२ अंडी
८५ ग्रॅम बदामाचे पीठ
१ टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स (अल्सी) पावडर
आयसिंग शुगर
बटाट्याचे चिप्स सर्व्हिंगसाठी
१. ओव्हन १८० डिग्री सेल्सियसवर गरम करा. बेकिंग ट्रेवर २ मध्यम केळी घेऊन १०-१५ मिनिटे भाजून घ्या. थोडं थंड होऊ द्या.
२. केळी सोलून एका मोठ्या भांड्यात घालून काट्याचा वापर करून मॅश करा. बटर घाला आणि चांगले एकत्र होईपर्यंत फेटून घ्या.
३. दालचिनी पावडर, व्हॅनिला एसेन्स, लिंबाचा रस, मॅपल सिरप, बेकिंग सोडा, समुद्री मीठ घालून त्याच बाऊलमध्ये अंडी फोडून नीट फेटून घ्या.
४. त्यात बदामाचे पीठ, फ्लॅक्स सीड पावडर घालून मिश्रण चांगले एकत्र होईपर्यंत फोल्ड करावे.
५. तयार केलेले पीठ सिलिकॉन साच्यात हलवा आणि हळुवारपणे टॅप करा. बेकिंग ट्रेवर साचा ठेवा. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे बेक करा.
६. ओव्हनमधून साचा बाहेर काढा आणि खोलीच्या तापमानावर थंड होऊ द्या. डी-मोल्ड करा आणि स्लाइस कापून घ्या.
७. वर साखर टाकून काही तुकडे टिफिन बॉक्समध्ये ठेवा. बटाट्याच्या चिप्ससोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या