Watermelon pizza: घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Watermelon pizza: घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा

Watermelon pizza: घरच्याघरी बनवा हा अनोखा टरबूज पिझ्झा! खायला हेल्दी आणि बनवायला अगदी सोपा

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jun 24, 2024 04:31 PM IST

Watermelon pizza: उन्हाळ्यात टरबूज खाणे सर्वांनाच आवडते. आज आम्ही तुम्हाला या टरबूजापासून बनवलेली एक अनोखी रेसिपी सांगणार आहोत. होय, आज आम्ही तुम्हाला कलिंगडापासून पिझ्झा कसा बनवायचा हे शिकवणार आहोत. हे बनवायला अतिशय सोपे आणि चवीलाही खूप चवदार असते.

recipe to make viral Watermelon pizza at home: टरबूज पिझ्झा
recipe to make viral Watermelon pizza at home: टरबूज पिझ्झा (Shutterstock)

उन्हाळ्याच्या ऋतूत काहीतरी थंड आणि ताजेतवाने खाण्याची इच्छा नेहमीच असते. टरबूज हे या काळात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे कारण टरबूजपेक्षा अधिक ताजेतवाने काय असू शकते. थंड टरबूज खायला मिळालं तर संपूर्ण मन प्रसन्न होते. आज आम्ही तुम्हाला कलिंगडापासून बनवलेली एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत. होय, आज आम्ही तुम्हाला कलिंगडापासून पिझ्झा कसा बनवायचा ते सांगणार आहोत. हे बनविणे खूप सोपे आहे आणि खूप आरोग्यदायी देखील आहे. लहान मुले किंवा म्हातारे सगळेच त्याचा मनमुराद आस्वाद घेऊ शकता.

टरबूज पिझ्झा खरंतर फळांपासून बनवला जातो. यासाठी पीठ किंवा सॉसची गरज नसते. केवळ फळांपासून बनवलेला असल्याने तो अतिशय आरोग्यदायी आणि चविष्टही असतो. हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्ही घरात असलेली फळे वापरु शकता. पण येथे आम्ही तुम्हाला अशा काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हा पिझ्झा अधिक चविष्ट होतो.
वाचा: ओट्स खाण्याचे 'हे' आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या ओट्स बनवण्याची रेसीपी

कोणती फळे घ्यावीत?

थोडी हिरवी आणि काळी द्राक्षे, एक केळी, एक संत्री, एक किवी, थोडी पुदिन्याची पाने, अर्धा कप दही, मध, मीठ ही फळे घ्यावीत
वाचा: दही कढी खायला आवडते? मग ‘या’ ३ प्रकारच्या चटपटीत रेसिपी नक्की करा ट्राय!

बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे

- प्रथम टरबूज धुवून घ्या. चाकूच्या साहाय्याने गोल आकारात कापून घ्या. जसा पिझ्झाचा बेस असतो. या गोल आकाराची जाडी सुमारे एक इंच असावी. आता पिझ्झाप्रमाणेच त्यापासून काही स्लाइस बनवा. त्यात सुमारे ६ तुकडे तयार होतील.
वाचा: उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी! काय आहे IRCTCच्या पॅकेजमध्ये खास?

- आता प्रत्येक पिझ्झा स्लाइसवर दही लावा. दही संपूर्ण तुकड्यावर चांगले पसरवा. आता आपल्याकडे असलेल्या सर्व फळांचे छोटे छोटे तुकडे करून टॉपिंग तयार करा. आता दह्याच्या वर या फळांचे टॉपिंग सजवा.
वाचा: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?

- पिझ्झाच्या या सर्व तुकड्यांवर थोडं मीठ शिंपडा. आपण आपल्या चवीनुसार थोडे मध देखील घालू शकता. वर पुदिन्याची पाने टाकून थंड सर्व्ह करा.

Whats_app_banner