मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moong Dal Pizza: मैद्याऐवजी मूग डाळपासून बनवा टेस्टी पिझ्झा, नोट करा शेफ पंकजची ही रेसिपी

Moong Dal Pizza: मैद्याऐवजी मूग डाळपासून बनवा टेस्टी पिझ्झा, नोट करा शेफ पंकजची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2024 05:47 PM IST

Pizza recipe for Kids: मुलांना पिझ्झा खायला खूप आवडतो. जर तुम्ही मुलांसाठी पिझ्झा बनवण्याचा विचार करत असाल तर मास्टरशेफ पंकज भदौरियाची ही हेल्दी पिझ्झा रेसिपी (pizza recipe) ट्राय करा. मूग डाळपासून हेल्दी पिझ्झा कसा बनवायचा ते पाहा.

मूग डाळचा पिझ्झा
मूग डाळचा पिझ्झा

Moong Dal Pizza Recipe: पिझ्झा ही इटालियन डिश असली तरी भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांन त्याच्या चवीचे फॅन आहेत. पिझ्झा साधारणपणे मैदा आणि पिठाच्या बेसनी तयार केला जातो. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना पिझ्झा खायला देताना थोडा विचार करावा लागतो. जर तुमच्या मुलानेही दर दुसऱ्या दिवशी पिझ्झा खाण्याचा हट्ट केला तर मास्टरशेफ पंकज भदौरियाची ही हेल्दी पिझ्झा रेसिपी ट्राय करा. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मूग डाळ पिझ्झाची फायबर आणि प्रोटीन रिच रेसिपी शेअर केली आहे. हा टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

मूग डाळ पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य (moong dal pizza)

- १ कप मूग डाळ

- १ कांदा

- १ टेबलस्पून कॉर्न

- १ टीस्पून ऑलिव्ह

- १ टोमॅटो

- १ शिमला मिरची

- १/२ कप मोझरेला चीज

- १ टीस्पून पिझ्झा सॉस

- १ टीस्पून चिली फ्लेक्स

- १ टीस्पून ओरेगॅनो

- २ चमचे तेल

- चवीनुसार मीठ

मूग डाळ पिझ्झा बनवण्याची पद्धत

मूग डाळ पिझ्झा (moong dal pizza) बनवण्यासाठी प्रथम भिजवलेली मूग डाळ ब्लेंडरमध्ये टाकून त्याची स्मूद पेस्ट तयार करा. यानंतर मूग डाळीच्या पिठात मीठ आणि इनो घालून मिक्स करा. आता एक कढई गरम करा, त्यात तयार केलेले पीठ घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. शिजवलेल्या बेसवर पिझ्झा सॉस पसरवा. नंतर त्यावर चीज आणि भाज्या घाला. आता हे झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजवा.

तुमचा चविष्ट मूग डाळ पिझ्झा तयार आहे. त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग