Eid Recipe: ईदला पाहुण्यांसाठी बनवा हे खास शरबत, थंडगार ड्रिंक्स वाढवतील सणाची मजा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid Recipe: ईदला पाहुण्यांसाठी बनवा हे खास शरबत, थंडगार ड्रिंक्स वाढवतील सणाची मजा

Eid Recipe: ईदला पाहुण्यांसाठी बनवा हे खास शरबत, थंडगार ड्रिंक्स वाढवतील सणाची मजा

Published Apr 10, 2024 09:51 PM IST

Eid 2024: ईदच्या निमित्ताने विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत स्वादिष्ट जेवणासोबतच तुम्ही काही टेस्टी ड्रिंक्स देखील बनवू शकता. या खास दिवशी हे ३ प्रकारचे शरबत ट्राय करा. पाहा रेसिपी

Eid Recipe: ईदला पाहुण्यांसाठी बनवा हे खास शरबत, थंडगार ड्रिंक्स वाढवतील सणाची मजा
Eid Recipe: ईदला पाहुण्यांसाठी बनवा हे खास शरबत, थंडगार ड्रिंक्स वाढवतील सणाची मजा

Sharbat Recipe For Eid: रमजानच्या संपूर्ण महिन्यात लोक अल्लाहची उपासना करतात आणि पापांची क्षमा मागतात. जेव्हा हा महिना संपतो तेव्हा ईद येते. चंद्रदर्शनानुसार ईदची तारीख निश्चित केली जाते. यावर्षी ईद-उल-फित्र म्हणजेच मिठी ईद हा सण ११ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. ईदनिमित्त विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही पाहुण्यांसाठी तीन प्रकारचे शरबतही तयार करू शकता. जाणून घ्या ईदला बनवल्या जाणाऱ्या शरबतची रेसिपी

मोहब्बत का शरबत (How to Make Mohabbat ka Sharbat)

ईदच्या निमित्ताने तुम्ही पाहुण्यांसाठी मोहब्बत का शरबत बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम टरबूजचे बारीक तुकडे करून घ्या. सोबतच सब्जा सीड्स पाण्यात भिजवा. नंतर एका भांड्यात २ ग्लास दूध घ्या. आता त्यात टरबूजचे छोटे तुकडे टाका. त्यानंतर त्यात गुलाब सरबत किंवा रुह अफजा घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. आता त्यात सब्जा घाला. नंतर त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि थंडगार सर्व्ह करा.

बेलाचे शरबत (How To Make Bel Sharbat)

ईदसाठी बेल फळाचे शरबत बनवता येते. यासाठी सर्वप्रथम बेल फळ घेऊन तो फोडून घ्या आणि त्याचा पूर्ण गर एका भांड्यात काढा. आता या गर मध्ये थंड पाणी मिक्स करा. आता हे सुमारे १ तास बाजूला ठेवा. नंतर एक तासानंतर सर्व काही मॅश करा. नंतर हा बेलाचा रस एका भांड्यात गाळून घ्या. गाळलेल्या सरबतमध्ये साखर घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर बर्फ घालून सर्व्ह करा.

बडीशेपचे शरबत (How To Make Saunf Sharbat)

बडीशेपचे शरबत बनवण्यासाठी बडीशेप २ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर बडीशेप पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाका. आता चवीनुसार साखर, काळे मीठ आणि पाणी घालून बारीक करा. आता बडीशेप सरबत कापडातून गाळून घ्या. शरबतमध्ये २ चमचे लिंबाचा रस घाला आणि चमच्याने चांगले मिक्स करा. आता एका ग्लासमध्ये बडीशेपचे सरबत घाला आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकून सरबत सर्व्ह करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बडीशेपच्या सरबतमध्ये खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर टाकू शकता. याने शरबतला आणखी सुंदर रंग येतो.

Whats_app_banner