Rava Ladoo Recipe: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये गोड पदार्थांना विशेष स्थान आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी गोड पदार्थ केले जातात. यामध्ये विविध प्रकारच्या बर्फी, पोळ्या, खीर, आणि लाडूंचा समावेश असतो. लाडू हा पारंपरिक प्रकार आवर्जून केला जातो. कुणाला बुंदीचे लाडू आवडतात, तर कुणाला बेसनाचे तर कुणाला रव्याचे लाडू खायला आवडतात. परंतु अनेकवेळा महिलांची तक्रार असते की, त्यांना प्रयत्न करूनही लाडू मनासारखे वळता येत नाही. यामध्ये रव्याचे लाडू कधी कडक होतात तर कधी कच्चे राहतात. परंतु आज आम्ही तूम्हाला अशी एक साधी सोपी रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे लाडू मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय तुमचे कौतुकही होईल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता पाहूया रव्याचे लाडू...
-रवा - १ कप
-दूध - १ कप
-तूप - २ चमचे
-मलई - २ चमचे (आवडीनुसार)
-चिरलेले बदाम - २ चमचे
-चिरलेला पिस्ता - १ टेबलस्पून
-चिरलेला काजू - २ चमचे
-सुकं खोबरं-२ चमचे -
-वेलची पावडर – १/२ टीस्पून
-पिठीसाखर - आवश्यकतेनुसार
महिला जेव्हा घरी रव्याचे लाडू बनवतात तेव्हा त्यांचे लाडू कच्चे तर असतात नाहीतर ते तुटतात. असे तेव्हा घडते जेव्हा रव्यात गुठळ्या असतात. गुठळ्या असल्याने लाडू नीट केले जात नाहीत. रव्यात गुठळ्या राहू नयेत. त्यामुळे लाडू बनवताना रवा चांगला भाजून घ्या. सर्वप्रथम एक कढई गरम करून त्यात तूप घाला. त्यात रवा घालून भाजून घ्या. भाजताना रवा सतत ढवळत राहा. असे केल्याने रव्यात गुठळ्या राहणार नाहीत. रवा भाजताना त्यामध्ये खोबऱ्याचा किससुद्धा घाला.
भाजलेल्या रव्याचे मिश्रण पातळ होऊ नये म्हणून गरम रव्यात साखरेचा पाक घालू नका. कारण असे केल्याने मिश्रण पातळ होते आणि पातळ मिश्रणामुळे लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत. त्यामुळे याची विशेष काळजी घ्या आणि प्रथम मिश्रण थोडे थंड होऊ द्या आणि नंतर त्यात पाक घाला. यासाठी एका पातेल्यात घेतलेल्या प्रमाणात पाणी आणि साखर ठेऊन पाक तयार करून घ्या. हा तयार पाक रव्याच्या मिश्रणात घालून लाडू वळायला घ्या. याचवेळी त्यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. हाताला हलकेसे तूप लावून अलगद हाताने लाडवाचे गोळे वळा. नंतर त्यावर उरलेले ड्रायफ्रूट्स चिकटवा.