Breakfast Recipes: नाश्त्यात तांदळाचा डोसा बनवायला वेळ नाही? 'या' पद्धतीने झटपट बनवा रवा डोसा-rava dosa quickly make restaurant style rava dosa for breakfast ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipes: नाश्त्यात तांदळाचा डोसा बनवायला वेळ नाही? 'या' पद्धतीने झटपट बनवा रवा डोसा

Breakfast Recipes: नाश्त्यात तांदळाचा डोसा बनवायला वेळ नाही? 'या' पद्धतीने झटपट बनवा रवा डोसा

Aug 21, 2024 08:50 AM IST

Restaurant style Dosa: डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी, पण आता तो संपूर्ण देशात प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनला आहे. डोसा आता घरोघरीही पोहोचला आहे.

झटपट बनणारा रवा डोसा रेसिपी
झटपट बनणारा रवा डोसा रेसिपी

Restaurant style Rava Dosa for breakfast: दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. त्यातल्या त्यात डोसा आणि इडली. डोस्याचे विविध प्रकार असतात. यामध्ये रवा डोसा आवडणाऱ्या लोकांची कमी नाही. डोसाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी, पण आता तो संपूर्ण देशात प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनला आहे. डोसा आता घरोघरीही पोहोचला आहे. आणि डोसा अनेक प्रकारे बनवला जात आहे. आज आपण रवा डोसा बद्दल बोलत आहोत. रवा डोसा ही एक परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे जी कमी वेळेत बनवता येते आणि त्याची चव देखील खूप छान असते. विशेषत: मुले रवा डोसा मोठ्या उत्साहाने खातात.

सांगायचं झालं तर, डोस्यामध्ये प्रचंड प्रकार आहेत. त्यात साधा डोसा, मसाला डोसा, लोणी डोसा ते पनीर डोसा, रवा डोसा असे अनेक प्रकार आहेत. जे खूप लोकप्रिय आहेत. जर तुम्हाला नाश्त्यासाठी रवा डोसा बनवायचा असेल तर आमच्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही तो कमी वेळात तयार करू शकता.तांदळाचा डोसा बनवण्यासाठी वेळ नसेल तर हा झटपट रवा डोसा तुम्ही बनवू शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी फॉलो केल्यास तुमचा डोसा अजिबात तव्याला चिकटणार नाही. चला जाणून घेऊया रवा डोसा बनवण्याची पद्धत…

साहित्य-

-रवा - १ कप

-तांदळाचे पीठ - १ कप

-आले चिरून - १/२ इंच

-हिरवी मिरची चिरलेली – ३

-जिरे - अर्धा टीस्पून

-काळी मिरी पावडर - अर्धा टीस्पून

-हिंग - १ चिमूटभर

-भाजलेले काजू - ३ टीस्पून

-तेल - आवश्यकतेनुसार

-मीठ - चवीनुसार

रवा डोसा बनवण्याची रेसिपी-

रवा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. आणि त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. दोन्ही नीट मिक्स केल्यानंतर त्यात जिरे, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. आता मिश्रणात थोडं पाणी घालून मऊ पीठ तयार करा. यानंतर, पीठ झाकून ठेवा आणि काही तास उबदार ठिकाणी ठेवा. दरम्यान, एका भांड्यात भाजलेले काजू, हिरवी मिरची, काळी मिरी आणि आले बाजूला ठेवा.

आता तुमच्याकडे असलेला तवा घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाका आणि पृष्ठभाग गुळगुळीत होण्यासाठी सगळीकडे पसरवा. आता पीठ एकदा चांगले फेटून घ्या आणि नंतर मिश्रण एका भांड्यात घेऊन तव्याच्या मध्यभागी ठेवा. यानंतर, शक्य तितका पातळ डोसा पसरवा. डोसा थोडा वेळ भाजल्यानंतर त्यात काजू आणि हिरवी मिरचीचे मिश्रण घालून पसरवा.

आता डोसाच्या कडांना तेल लावून ते तांबूस-सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर डोसा फोल्ड केल्यावर तव्यातून बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा. अशाचप्रकारे सर्व रवा डोसे एक एक करून तयार करा. ते नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करता येते.