Rasmalai Recipe: चीजपासून बनवलेल्या सर्वोत्कृष्ट डेझर्टमध्ये रसमलाईचा समावेश, घरी ट्राय करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rasmalai Recipe: चीजपासून बनवलेल्या सर्वोत्कृष्ट डेझर्टमध्ये रसमलाईचा समावेश, घरी ट्राय करा ही रेसिपी

Rasmalai Recipe: चीजपासून बनवलेल्या सर्वोत्कृष्ट डेझर्टमध्ये रसमलाईचा समावेश, घरी ट्राय करा ही रेसिपी

Mar 19, 2024 12:42 PM IST

Rasmalai Ranked in Top 10 Cheese Desserts: टेस्ट ॲटलसच्या सर्वोत्तम चीज डेझर्टच्या यादीत रसमलाईने दुसरे स्थान पटकावले आहे. घरच्या घरी रसमलाई बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

रसमलाई
रसमलाई (unsplash)

How to Make Rasmalai: रसमलाई हे बंगाली स्वीट आहे, जे दुधापासून तयार केले जाते. या गोड पदार्थाचा पोत मऊ आणि तोंडात वितळणारा असतो. अलीकडेच प्रसिद्ध फूड गाईड टेस्ट ॲटलसने जगातील १० सर्वोत्कृष्ट चीज डेझर्टची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये पोलंडच्या सर्निकला प्रथम, तर भारताच्या रसमलाईने दुसरे स्थान पटकावले. अशा परिस्थितीत तुम्हाला घरी रसमलाई बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. पाहा ही सोपी रसमलाईची रेसिपी (rasmalai recipe)

रसमलाई बनवण्यासाठी साहित्य

- ३ लिटर फुल क्रीम दूध

- ८ चमचे लिंबाचा रस

- २ चमचे कॉर्न फ्लोअर

- ८ कप पाणी

- २ कप साखर

- १०-१२ हिरवी वेलची पावडर

- ६-८ चमचे साखर

- बारीक चिरलेले पिस्ता

- एक चिमूटभर केशर

रसमलाई बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी एका जड तळाच्या पॅनमध्ये दूध उकळा. ते उकळायला लागल्यावर गॅस बंद करा आणि दुधाचे तापमान थोडे कमी करण्यासाठी अर्धा कप पाणी घाला. नंतर साधारण ५ ते १० मिनिटांनी दूधात लिंबाचा रस घाला, जोपर्यंत दूध फाटत नाही. दूध पूर्णपणे नीट फाटेपर्यंत त्यात लिंबाचा रस घाला. नंतर गाळणीच्या साहाय्याने त्यातील पाणी काढून टाका आणि छेना एकत्र करा. हा छेना नळाच्या पाण्याने धुवा, जेणेकरून त्यात लिंबाचा रस राहणार नाही. आता १०-१५ मिनिटे गाळणीत राहू द्या. नंतर छेना हाताने हळूहळू पिळून त्यातील पाणी काढून टाका. 

आता एका मोठ्या भांड्यात कॉर्नफ्लोअर घालून त्यात छेना मिक्स करा.ते गुळगुळीत होईपर्यंत मॅश करा. हे करण्यासाठी आपल्या तळहाताचा वापर करा. गुळगुळीत झाल्यावर त्याचे छोटे गोळे करा. एका रुंद पातेल्यात ४ कप पाण्यात १ वाटी साखर टाकून गरम करा. याला पूर्ण उकळी येईपर्यंत वाट पाहा. आता उकळत्या साखरेच्या पाकात गोळे टाका आणि १५-१७ मिनिटे शिजवा. काही वेळातच त्यांचा आकार दुप्पट होईल. आता पाकातून गोळे काढून ताज्या पाण्यात टाका.

आता त्याचा रस तयार करण्यासाठी एका जड तळाच्या पॅनमध्ये ५०० मिली दूध उकळा. एक चमचा गरम दुधात केशरचे काही धागे भिजवून बाजूला ठेवा. दुधाला उकळी आली की गॅस कमी करा आणि अधूनमधून दूध ढवळत राहा. साधारण १० मिनिटांनंतर साखर घाला आणि मिक्स करा. २०-२५ मिनिटांनी दूध घट्ट होईल तेव्हा त्यात भिजवलेले केशर आणि बारीक केलेली वेलची घाला. तसेच बारीक चिरलेला पिस्ता घाला. हे सर्व नीट मिक्स करून गॅस बंद करा.

आता ताज्या पाण्याच्या भांड्यातून थंड झालेली रसमलाई काढा. आपल्या हातांनी हलकेच पिळून घ्या आणि दुधात घालण्यापूर्वी सुमारे १०-१५ मिनिटे साखरेच्या पाकात घाला. आता हे गोळे घट्ट केलेल्या दुधात ठेवा. हे रात्रभर किंवा ५-६ तास थंड करा.तुमची रसमलाई तयार आहे. पिस्ताचे काप आणि केशरने सजवून सर्व्ह करा.

Whats_app_banner