Ramadan: पवित्र रमजान महिना व रोजाचे महत्त्व आणि इतरही खास माहिती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ramadan: पवित्र रमजान महिना व रोजाचे महत्त्व आणि इतरही खास माहिती

Ramadan: पवित्र रमजान महिना व रोजाचे महत्त्व आणि इतरही खास माहिती

Published Apr 02, 2022 01:18 PM IST

यावर्षी२एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभहोत आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास शनिवार (२ एप्रिल)पासून प्रारंभ होत आहे. इस्लाम धर्मात पवित्र'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात.

<p>पवित्र रमजान&nbsp;महिना व रोजाचे महत्त्व</p>
<p>पवित्र रमजान&nbsp;महिना व रोजाचे महत्त्व</p>

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास शनिवार (२ एप्रिल)पासून प्रारंभ होत आहे. इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. यावर्षी २ एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ होत आहे. २ किंवा ३ मे २०२२ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फितर) साजरी केली जाणार आहे. 

 

रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात.


रोजाचा मूळ उद्देश -
रमजानमध्ये रोजा या शब्दाला आरबी भाषेत सोम म्हणतात, याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘ इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.

 

'रमजान' मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो.


रमजान महिन्याचे तीन हिस्से
रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचा पहिला दशक 'कृपेचा', दुसरा दशक 'क्षमेचा', तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून 'मुक्ततेचा' मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल. त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यांत मिळणार्‍या नेकी (पुण्याई) पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते. त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीतजास्त नेकी कमाविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहस शरण जातात.

 

का साजरी केली जाते रमजान ईद –

रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद. परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद या दिवसाला ईद उल फित्र असेही म्हणतात. हा महिना व हा दिवस मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र व मंगलमय असा मानला जातो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात २९-३० दिवसांचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र म्हणजे ईद ही चंद्रदर्शनाने साजरी केली जाते. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते व दानधर्म केला जातो.

पहिली ईद –

जंग ए बदार ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ईद-अल-फित्र साजरी केली होती. पवित्र कुरान याच महिन्यात अवरतले असल्यामळे इस्लाममध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे. 

शिरकुर्माचे खास जेवण –

ईदच्या दिवशी सकाळी नमाज अदा झाल्यानंतर पहिल्यांदा दहीभात आणि साखरेचे जेवण होते. त्याचवेळी खजूर खाण्याचीही पद्धत आहे. कारण महंमद पैंगवर व त्यांच्या कुटूंबातील लोकांना हाच पदार्थ उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची व इतरांना देण्याची पद्धत आहे. यावेळी मिठाई व शिरखुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात.

पुण्य कमवा व पाप जाळा –

रमजानचा मुख्य संदेश पुण्य (दुवा) कमवा आणि पाप जाळा असा आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा किंवा शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो. रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून ९ वेळा नमाज अदा केली जाते. सलग ३० दिवस रोजा (उपवास) केला जातो. हा रोजा १२ तासांचा असतो. सुर्योदयापासून अन्न पाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्यात पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे व शेवटचे १० दिवस रोजेदारांचे रक्षण करण्यासाठी असतात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी रहा असाच आहे. 

Whats_app_banner