Ramadan 2024: रमजानमध्ये बनवा टेस्टी सुक्या शेवया, ट्राय करा ही कच्छी मुस्लिम पद्धतीची रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ramadan 2024: रमजानमध्ये बनवा टेस्टी सुक्या शेवया, ट्राय करा ही कच्छी मुस्लिम पद्धतीची रेसिपी

Ramadan 2024: रमजानमध्ये बनवा टेस्टी सुक्या शेवया, ट्राय करा ही कच्छी मुस्लिम पद्धतीची रेसिपी

Mar 15, 2024 10:20 PM IST

Ramadan Special Recipe: रमजान मध्ये काही तरी गोड बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी ट्राय करू शकता. कच्छी मुस्लिम पद्धतीने सुक्या शेवया कशा बनवायचे ते जाणून घ्या.

सुक्या शेवया
सुक्या शेवया (freepik)

Dry Seviyan Recipe: रमजानचा महिना सुरू झाला असून, या काळात लोक अल्लाहची उपासना करतात. या महिन्यात बरेच लोक दिवसभर उपवास करतात. या काळात सेहरी आणि इफ्तारसाठी विविध पदार्थ सुद्धा बनवले जातात. तुम्हाला सुद्धा रमजानमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही सुक्या शेवया बनवू शकता. कच्छी मुस्लिम पद्धतीने बनवली जाणारी ही रेसिपी खूप टेस्टी आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यात ही टेस्टी रेसिपी बनवता येते. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे सुक्या शेवया.

सुक्या शेवया बनवण्यासाठी साहित्य

- शेवया

- तूप

- काजू

- बदाम

- पिस्ता

- वेलची पावडर

- साखर ( चवीनुसार )

- पाणी

सुक्या शेवया बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व ड्रायफ्रूट्स घालून उकळून घ्या. शेवया साध्या असतील तर त्या खरपूस भाजून घ्. बाजारात भाजक्या शेवया सुद्धा मिळतात. ते वापरणार असाल तर हलक्या गरम करून घ्या. आता या भाजलेल्या शेवया उकळत्या पाण्यात टाकुन २ मिनिट शिजवून मऊ करून घ्या . आता लगेच त्यात गार पाणी टाकून शेवया निथळून घ्या. आता एका कढईत तूप गरम करून घ्या. एक कप शेवयासाठी तुम्ही ४ चमचे तूप घेऊ शकता. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते जास्त घेतले तरी चांगले लागते. लक्षात ठेवा यात तूपाचे प्रमाण नीट असेल तर शेवया टेस्टी होतात. आता कढईत निथळून घेतलेल्या शेवया घालून मिक्स करा. शेवया सतत ढवळत राहा जेणेकरून ते खालून चिकटणार नाहीत. साधारण ५ मिनिटांनंतर त्यात साखर घाला. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 

तुम्हाला शेवयाचा रंग थोडा थोडा डार्क होताना दिसेल आणि शेवया मधील पाण्याचा अंश पूर्ण गेला पाहिजे तोपर्यंत सतत ढवळत राहा. साधारणपणे २० ते २५ मिनिटांनी हे कच्छी पद्धतीच्या सुक्या शेवया तयार होतील. आता यात वेलची पावडर टाकून मिक्स करा. वरून ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करा.

Whats_app_banner