मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chicken Nuggets: इफ्तारसाठी बनवा चिकन नगेट्स, सोपी आहे रेसिपी

Chicken Nuggets: इफ्तारसाठी बनवा चिकन नगेट्स, सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2024 02:35 PM IST

Ramadan 2024 Recipe: जर तुम्हाला इफ्तारसाठी चिकनी एखादी रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही चिकन नगेट्सची ही रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या ही सोपी रेसिपी

चिकन नगेट्स
चिकन नगेट्स (unsplash)

Chicken Nuggets Recipe for Iftar: इफ्तारसाठी बहुतांश घरी चविष्ट आणि रुचकर पदार्थांची मागणी अनेकदा केली जाते. अशा परिस्थितीत महिला चिकनपासून बनवलेले हे टेस्टी नगेट्स ट्राय करू शकतात. हे बनवयला खूप सोपे आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते आधीच तयार करून ठेवू शकता. नंतर हे बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर तुम्ही हे नगेट्स आधीच तयार करून ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी आणि चविष्ट चिकन नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

चिकन नगेट्स बनवण्यासाठी साहित्य

- १ पाव बोनलेस चिकन

- १ कप रवा

- २ अंडी

- बारीक चिरलेली कोबी

- ३ कांदे बारीक चिरलेले

- १/२ वाटी गाजर बारीक चिरलेले

- १ सिमला मिरची बारीक चिरलेली

- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

- १/२ चमचा लसूण पेस्ट

- १/३ चमचा तेल

- १ चमचा बारीक केलेली लाल मिरची

- १ चमचा काळी मिरी

- चिकन मसाला

- २ चमचे सोया सॉस

- ब्रेड क्रंब्स

- २ कप पाणी

- मीठ चवीनुसार

चिकन नगेट्स बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम बोनलेस चिकन नीट धुवून मॅश करून घ्या. आता कढईत तेल टाकून त्यात लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.बारीक चिरलेला कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परता. कांदा भाजला की त्यात मॅश केलेले चिकन घालून मंद आचेवर भाजा. याचा रंग बदलेपर्यंत हे नीट भाजावे लागेल. नंतर बारीक चिरलेली कोबी, गाजर आणि सिमला मिरची घाला. नीट मिक्स करा आणि भाजी थोडी शिजू द्या. भाजी नीट एकजीव झाल्यावर त्यात काळी मिरी, मीठ, लाल मिरची घालावी. तसेच चिकन मसाला आणि सोया सॉस घाला. एक कप रवा घालून भाजून घ्या.नंतर दोन कप पाणी घालून सर्व चांगले मिक्स करा. आता गॅसची फ्लेम वाढवा आणि पाणी पूर्ण सुकत नाही तोपर्यंत आणि मिश्रण कोरडे होईपर्यंत ढवळत राहा. मिश्रण कोरडे आणि घट्ट झाल्यावर पॅनमधून काढून थंड करा. आता एका प्लेटमध् येब्रेड क्रंब्स आणि दुसऱ्या प्लेटमध्ये दोन अंडी घ्या. अंडी चांगले फेटून घ्या. जेणेकरून ते समान प्रमाणात लावता येईल. 

आता तयार मिश्रणाला आकार द्या आणि प्रथम अंडी आणि नंतर ब्रेड क्रंब्ससोबत कोट करा. नंतर तेल गरम करून त्यात हे तयार केलेले नगेट्स सोनेरी होईपर्यंत तळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चिकन नगेट्स तयार करून फ्रीजरमध्ये एअर टाईट डब्यात ठेवू शकता. गरज असेल तेव्हा पटकन तळून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.