Ramadan Eid Mubarak 2023: रमजान ईद निमित्त मित्रपरिवाराला पाठवा हे शुभेच्छा संदेश!
Ramadan Eid Mubarak 2023 Wishes In Marathi: काल २१ एप्रिलला चंद्रदर्शन झाल्यामुळे आज शनिवारी २२ एप्रिलला रमजान ईद (Eid-Ul-Fitr 2023) साजरी केली जाणार आहे.
Ramadan Eid Mubarak 2023 Messages: ईद (Ramadan Eid) हा इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. रमजान महिना ईद साजरी करत संपतो. ईदचा सण बंधुभाव आणि शांतीचा संदेश देतो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईदचा पवित्र सण रमजानच्या पवित्र महिन्याच्या ३० व्या दिवशी आणि १० व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. ईदच्या निमित्त घरोघरी खास प्रकारची शेवया बनवून एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत आणि ही खास गोड डिश देऊन सण साजरा केला जातो. ईदच्या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ईद मुबारक संदेश (Facebook, WhatsApp Status, HD Images, Quotes) देखील पाठवू शकता.
ट्रेंडिंग न्यूज
पाठवा हे शुभेच्छा संदेश
> ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!!
> हर ख्वाहिश हो मंजूर-ए-खुदा,
मिले हर कदम पर रजा-ए-खुदा
फ़ना हो लब्ज-ए-गम यही है दुआ,
बरसती रहे सदा रहमत-ए-खुदा
आप सभी को ईद मुबारक!!
> तुम्हाला आणि तुमच्या परिवारला
आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!
> फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक!!
> धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमजान ईदची… ईद मुबारक!!
> अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!!!
( मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
विभाग