मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ramphal Benefits: केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे रामफळ, राम नवमीला असते विशेष महत्त्व

Ramphal Benefits: केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे रामफळ, राम नवमीला असते विशेष महत्त्व

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 12, 2024 07:31 PM IST

Ram Navami 2024 Special: राम नवमीच्या काळात रामफळाला विशेष महत्त्व असते. हे फळ केवळ तुमच्या आरोग्यासाठी नाही तर सौंदर्य राखण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या रामफळचे फायदे.

Ramphal Benefits: केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे रामफळ, राम नवमीला असते विशेष महत्त्व
Ramphal Benefits: केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे रामफळ, राम नवमीला असते विशेष महत्त्व ( freepik)

Benefits of Ramphal: चैत्र महिन्यातील नवमीला राम नवमी साजरी केली जाते. यावर्षी १७ एप्रिल रोजी राम नवमी साजरी होणार आहे. या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. राम नवमीच्या काळात रामफळाला विशेष महत्त्व आहे. रामफळ हा या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. रामफळ हा अन्नोनस गटाचे फळ आहे, जे सीफातळ नावाच्या फळासाठी प्रसिद्ध आहे . रामफळ हे केशरी रंगाचे फळ आहे, ज्याचा आकार बैलाच्या हृदयासारखा आहे. बऱ्याच लोकांना सीताफळ एवढे रामफळ आवडत नाही. पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय ते त्वचा आणि केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊया आरोग्य आणि सौंदर्यासाठी रामफळचे फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

मधुमेहासाठी चांगले

मधुमेह असलेल्या लोकांसाठी विशेषत: फळांच्या बाबतीत काय खावे आणि काय नाही याची निवड करणे हा सतत संघर्ष असतो. रामफळ हे एक हायपर-लोकल फळ आहे जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात रक्तातील ग्लुकोज कमी करणारे गुणधर्म आहेत. त्यात खनिजे आहेत, ज्यामुळे ते प्री डायबिटीस आणि मधुमेहासाठी योग्य बनते.

प्रतिकारशक्ती सुधारते

वातारवरणातील बदलामुळे अनेक लोक सतत आजारी पडतात. तसेच जे लोक सतत सर्दी-खोकल्याचा सामना करतात त्यांच्या सर्वांसाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते. यातील व्हिटॅमिन सी, ए आणि बी प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ कमी करते.

कमकुवत सांध्यांना मदत करू शकते

वातावरणात सतत बदल होत असल्याने अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. विशेषत: वृद्धांना या त्रास जास्त असतो. अशा वेळी सांधेदुखीपासून रामफळ तुमचा बचाव करेल. तज्ज्ञ स्पष्ट करतात की रामफळ अँटी इंफ्लेमेटरी असल्याने आणि शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करू शकते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्यांना तोंड देण्यास मदत होईल.

हार्ट फ्रेंडली

रामफळमध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. हे हृदयाजवळ जमा झालेल्या चरबीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते आणि हृदयाशी संबंधित समस्यांना प्रतिबंधित करते. फॅटी लिव्हर असलेल्या लोकांसाठी देखील हे उत्तम आहे. आपल्या आहारात अधिकाधिक फळांचा समावेश करणे हा एक चांगला मार्ग आहे.

त्वचा आणि केसांसाठी चांगले

जर तुमचे केस फ्रिजी असतील आणि तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा असतील तर रामफळ तुमच्यासाठी उत्तम आहे. रामफळमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला तसेच केसांनाही फायदा होतो. अडल्ट एक्ने कमी करण्यासाठी देखील रामफळ चांगले आहे. यातील व्हिटॅमिन सी त्वचेच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. तुमचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर हे फळ तुमची चमक परत आणण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel