Rakul Preet Singh: पिंक कुर्ता घालून मंदिरात गेली रकुल प्रीत, अनारकली ड्रेस घालताना करू नका या चुका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rakul Preet Singh: पिंक कुर्ता घालून मंदिरात गेली रकुल प्रीत, अनारकली ड्रेस घालताना करू नका या चुका

Rakul Preet Singh: पिंक कुर्ता घालून मंदिरात गेली रकुल प्रीत, अनारकली ड्रेस घालताना करू नका या चुका

Feb 19, 2024 07:03 PM IST

Styling Tips: रकुल प्रीत सिंह २२ फेब्रुवारीला गोव्यात लग्न करणार आहे. त्यामुळे लग्नापूर्वीच्या उत्सवांना सुरुवात झाली आहे. सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेल्या रकुलप्रीतकडून अनारकली कुर्ता घालण्याच्या काही टिप्स जाणून घ्या.

रकुल प्रीत सिंह
रकुल प्रीत सिंह

Mistakes While Wearing Anarkali Dress: बॉलिवुड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झाले आहेत. नुकतीच ती जॅकी भगनानीसोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. यावेळी तिने घातेल्या पावडर पिंक कलरच्या लाँग अनारकली कुर्त्यामध्ये ती अधिक सुंदर दिसत होती. तिचा हा प्री-ब्राइडल लूक आकर्षक दिसत होता. या ड्रेसवरून मुली नक्कीच प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही सुद्धा अनारकली ड्रेस घालत असाल तर आधी कोणत्या चुका करू नये, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घ्या.

कसा होता लूक

रकुल प्रीत सिंहने सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पावडर पिंक रंगाचा अनारकली कुर्ता घातला होता. ज्यासोबत लांब फंकी कानातले आणि हाय पोनीटेल कॅज्युअल लुक देत होते. लग्नाच्या फंक्शनमध्ये तुम्ही लाँग अनारकली कुर्ता कॅरी करणार असाल तर या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा

अनारकली कुर्ता घालताना लक्षात ठेवा या गोष्टी

लांबी लक्षात ठेवा

जर तुम्ही अनारकली कुर्ता ड्रेस घालणार असाल तर तुमच्या उंचीनुसार ड्रेसची लांबी लक्षात ठेवा. अनारकलीचा परफेक्ट लूक तेव्हाच येतो जेव्हा ती व्यवस्थित फिटेड आणि योग्य लांबीची असते. जर तुम्ही फ्लोअर लेन्थ अनारकली कुर्ता घालणार असाल तर नेहमी हील्स लक्षात ठेवून घाला. थोडा लांब कुर्ता तुमचा संपूर्ण लुक खराब करू शकतो. त्यामुळे ड्रेसची लांबी टोपर्यंत ठेवा. जेणेकरून तुम्ही हील्स नसतानाही ते सहज घालू शकता.

वेस्टलाइनची काळजी घ्या

अनारकली कुर्ता घालताना कळ्यांच्या वेस्टलाइनची सुद्धा काळजी घ्या. जिथून कळी सुरू होते तिथून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बेल्ट योग्य स्थितीत असावा. उदाहरणार्थ जर तुम्ही पोटाच्या बाजूने हेवी असाल, तर कळ्यांची स्टार्टिंग थोडी कंबरेजवळून असावी असा प्रयत्न करा. दुसरीकडे जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही बस्ट क्षेत्राच्या अगदी खालून कळ्यांची स्टार्टिंग करू शकता. यामुळे अनारकली कुर्त्याचा लूक आणखी चांगला दिसेल.

फुटवेअरची घ्या काळजी

जेव्हा तुम्ही अनारकली ड्रेस घालता तेव्हा फुटवेअरची सुद्धा काळजी घ्या. साध्या बॅलेरिना किंवा समोर-बंद असलेले फुटवेअर मॅच करू नका. जर तुम्हाला ते घालायचे असेल तर हील्स असलेले पम्प्स किंवा जुती मॅच करा. अनारकली कुर्त्या सोबत स्ट्रॅपी हिल्स परफेक्ट दिसतात. ड्रेस सोबत कोणत्या प्रकारचे फूटवेअर कॅरी करावे याची विशेष काळजी घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner