Rakshabandhan Gift Ideas: बहिणीला गिफ्ट द्यायचंय, पण खिशात पैसा कमीय? मग कमी खर्चात द्या या भेटवस्तू-rakshabandhan gift ideas what gifts can you give your sister in a low budget ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rakshabandhan Gift Ideas: बहिणीला गिफ्ट द्यायचंय, पण खिशात पैसा कमीय? मग कमी खर्चात द्या या भेटवस्तू

Rakshabandhan Gift Ideas: बहिणीला गिफ्ट द्यायचंय, पण खिशात पैसा कमीय? मग कमी खर्चात द्या या भेटवस्तू

Aug 14, 2024 09:37 AM IST

Rakshabandhan Gift Ideas: दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमचे बजेट टाईट आहे आणि तुम्ही तुमच्या बहिणीला काही महागडे गिफ्ट देऊ शकत नाही. तर आता त्याबाबत चिंता करायची गरज नाही.

Rakshabandhan Gift Ideas
Rakshabandhan Gift Ideas (shutterstock)

Rakshabandhan Gift Ideas: रक्षाबंधन हा बहीणभावाच्या नात्यातील ओलावा टिकविणारा आणि त्याचे महत्व जपणारा सण आहे. रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू आणि आशीर्वाद देण्याची परंपरा नेहमीच चालत आली आहे. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमचे बजेट टाईट आहे आणि तुम्ही तुमच्या बहिणीला काही महागडे गिफ्ट देऊ शकत नाही. तर आता त्याबाबत चिंता करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही या कमी खर्चात उत्तम भेटवस्तू देऊ शकता. तुम्हाला एक हजार रुपयांच्या आत अनेक प्रकारचे गिफ्ट पर्याय सहज मिळतील. जे बहिणीला आनंद देण्यासाठी दिले जाऊ शकतात. त्यामुळे उशीर करू नका आणि या भेटवस्तू लगेच खरेदी करा.

कृत्रिम दागिने-

तुमच्याकडे बजेट नसेल तर सोन्या-चांदीचे दागिने घेण्याऐवजी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले साधे वैयक्तिक कृत्रिम दागिने खरेदी करू शकता. नेकपीसच्या लॉकेटमध्ये विशेष अक्षरे, नावे किंवा कोणतीही आवडती वस्तू मिळवा आणि भेट म्हणून द्या. ही सुंदर भेट पाहून बहिणीला नक्कीच आनंद होईल.

फिटनेस रिस्ट बँड-

तुमच्या बहिणीच्या फिटनेसची काळजी घेण्यासोबतच तुम्ही कमी बजेटमध्ये गिफ्टही देऊ शकता. अनेक प्रकारचे फिटनेस बँड आणि अंगठ्या एक हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याची खरेदी करून तुम्ही तुमच्या बहिणीचा दिवस खास करू शकता.

घर सजावटीच्या वस्तू-

जर तुम्हाला तुमच्या बहिणीला आनंदी ठेवायचे असेल, तर तिचे सुंदर घर सजवण्यासाठी तिला काही घरगुती सजावटीचे सामान द्या. ५०० ते १००० रुपयांच्या आत घर सजावटीच्या वस्तू सहज उपलब्ध होऊ शकतात. या भेटवस्तू पाहून कोणतीही बहिण नक्कीच आनंदी आणि उत्साही होईल.

स्किन केअर प्रॉडक्टस-

वास्तविक, स्किन केअर उत्पादनांचे संपूर्ण किट महाग असते. परंतु अनेक वेळा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये लहान पॅकेट आकारात उत्पादने मिळतील. रक्षाबंधनाच्या दिवशी स्किन केअर प्रोडक्ट किटही भेट देऊ शकता. अलीकडे प्रत्येक मुलीला स्किनची काळजी घ्यायला आवडते. त्यामुळे ही भेटवस्तू त्यांना नक्कीच आवडेल.

हॅन्डबॅग-

स्त्रियांना दागिने आणि ॲक्सेसरीजची विशेष आवड असते. जर तुम्हाला तुमच्या बहिणीला खूश करायचे असेल आणि तेही बजेटमध्ये, तिला एक सुंदर हॅन्डबॅग गिफ्ट म्हणून द्या. तो हॅन्डबॅग डिझायनर नसला तरी त्याला चांगल्या डिझाईन केलेल्या साध्या बॅग्ससुद्धा नक्कीच आवडतील. त्यामुळे उशीर करू नका आणि बजेट लक्षात घेऊन या भेटवस्तू खरेदी करा. रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित होईल आणि बजेटबाबत कोणतेही टेन्शन राहणार नाही.

विभाग