Raksha Bandhan 2024 Marathi Message: श्रावण महिन्यात विविध सण साजरे केले जातात, त्यातीलच एक म्हणजे रक्षाबंधन होय. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण खूप खास आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. आशीर्वाद आणि प्रेम म्हणून बहीण भाऊ एकमेकांना भेटवस्तू देखील देतात. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी होणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावापासून दूर असाल, तर तुम्ही हे खास मेसेज आणि कोट्स पाठवून त्यांना शुभेच्छा देवू शकता. हे वाचून त्यांना नक्कीच आनंद होईल. शिवाय तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.
''भाऊ लहान असो वा मोठा,
बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान
नेहमीच अढळ आणि मोठंच असतं.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कराण
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''मी या जगातील भाग्यवान बहीण आहे,
कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा
असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे. '
कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच
पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''माझा मोठा दादा म्हणजे,
आईशीपण बोलता येणार नाहीत
अशा गोष्टी शेअर करता येणारा
एक जवळचा साथीदार''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''मला सुपरहिरोची काहीच गरज नाही
कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''जितका दूर असतोच तितकीच
जास्त काळजी घेतोस,
माझा भाऊ माझी प्रत्येकक्षणी काळजी घेतो.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते.
वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील,
पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''फक्त एक भाऊच असतो,
जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो
आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो.''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
''भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे,
जो हसवून रडवतो तो भाऊ
आणि जी हसवून रडवते ती बहीण''
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!