Rakshabandhan 2024: रक्षाबंधनासाठी ओवाळणीचं ताट सजवताय? फॉलो करा या टिप्स, भाऊ होईल इम्प्रेस-rakshabandhan 2024 ideas to decorate rakhi platter ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rakshabandhan 2024: रक्षाबंधनासाठी ओवाळणीचं ताट सजवताय? फॉलो करा या टिप्स, भाऊ होईल इम्प्रेस

Rakshabandhan 2024: रक्षाबंधनासाठी ओवाळणीचं ताट सजवताय? फॉलो करा या टिप्स, भाऊ होईल इम्प्रेस

Aug 18, 2024 10:09 AM IST

Rakshabandhan 2024: बहिणी भावाच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आणि एकमेकांबद्दल प्रेम,आदर व्यक्त करण्यासाठी हा सण आहे.

Rakshabandhan 2024
Rakshabandhan 2024

Rakshabandhan 2024: भावा-बहिणीच्या प्रेमाचे आणि अतूट विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. हा सण हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. बहिणी भावाच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आणि एकमेकांबद्दल प्रेम,आदर व्यक्त करण्यासाठी हा सण आहे. रक्षाबंधनाचा सण खास बनवण्यासाठी बहिणी अनेक दिवस आधीच तयारी सुरू करतात. रक्षाबंधनाला ओवाळणीची थाळी हा या तयारीचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाला टिळा लावण्यासाठी वापरले जाणारे ओवाळणीचे ताट अत्यंत विचारपूर्वक निवडते.

ओवाळणीचे ताट सजवण्यासाठी या टिप्स फॉलो करा-

रिबन आणि गोटा-पट्टीने ताट सजवा-

राखीची थाळी सजवण्यासाठी तुम्ही गोटा-पट्टी, आरसे, सोनेरी लेस, मणी, रंगीबेरंगी फिती वापरू शकता.

छापील किंवा मखमली कागद -

राखीची थाळी सजवण्यासाठी सर्वप्रथम एक ताट स्वच्छ करा आणि संपूर्ण ताटावर छापील कागद किंवा मखमली कागद चिकटवा. तुम्ही पेपर लावताच, तुम्हाला दिसेल की ताटाचे संपूर्ण रूपच बदलून गेले आहे.

झेंडूची फुले-

राखीचे ताट तुम्ही फक्त झेंडूच्या फुलांनी सजवू शकता. अशा प्रकारे राखीचे ताट सजवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही आणि ती खूप सुंदरही दिसते.

नेल पेंट्सने सजवा ओवाळणीचे ताट-

तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या नेल पेंट्सने आर्ट वर्क करूनदेखील ओवाळणीचे ताट सजवू शकता.

ऑरगॅनिक सजावट-

रक्षाबंधनसाठी ओवाळणीचे ताट तुम्ही ऑरगॅनिक पद्धतीने सजवण्यासाठी तांदळाला वेगवेगळ्या रंगांनी रंग देऊन थाळीवर चिकटवून सुंदर रचना करा.

केळीची पाने-

रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणीच्या ताटावर गंगाजल शिंपडून, थाळीच्या आकारात केळीचे पान गोल कापून पसरवून पूजा थाळी तयार करता येते. या ताटात कुमकुम ठेवा. या कुमकुमने बहिणी आपल्या भावांना टीळा लावतात.

विभाग