Rakshabandhan 2024: हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन होय. येत्या १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. यादिवशी बहीण भावाला राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त करते. तर भाऊ बहिणीला आयुष्यात सदैव पाठीशी राहून तिची रक्षा करण्याचे वचन देतो. बहीण भावाच्या गोड नात्याला मजबूत बनवण्यासाठी हा सण महत्वाचा आहे. अलीकडे नवनवीन ट्रेंड आले आहेत. यामध्ये बहिण बहिणीला राखी बांधते, तर बहीण भावाला रिटर्न गिफ्टसुद्धा देते. आज हाच ट्रेंड फॉलो करत, आज आम्ही तुम्हाला भावाला गिफ्ट देता येणाऱ्या काही हटके वस्तू सुचविणार आहोत. चला तर मग पाहूया.
आजकालच्या बहुतांश मुलांना क्लीन शेव्हिंगची अजिबात आवड नाही. आजच्या सर्रास मुलांना दाढी ठेवायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावासाठी ट्रिमिंग किट खरेदी करू शकता. हे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्याचा वापर ते दाढी ठेवण्यासाठी करू शकतात. आणि त्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सलूनमध्ये जावे लागणार नाही.
सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेमिंगपासून सोशल नेटवर्किंग साइट्स आणि वेब सीरिजपर्यंत सर्व काही पाहता येतं. अशा परिस्थितीत, मोबाईलची बॅटरी लवकर संपते, म्हणून तुम्ही तुमच्या भावाला राखी भेट म्हणून पॉवर बँक देऊ शकता. जेणेकरून त्याच्या फोनची बॅटरी संपली तरी, तो ज्याठिकाणी असेल त्याठिकाणी लगेच मोबाईल चार्ज करू शकतो.
यंदाच्या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला नेक बँड देणे हा एक चांगला पर्याय आहे. हा एक प्रकारचा हेडफोनच आहे जो कॅरी करणे खूप सोपे आहे. तुम्ही ते फक्त तुमच्या गळ्यात टाकून ठेवा. आणि जेव्हा कोणी कॉल करेल तेव्हा तुम्ही मोबाईल खिशात ठेऊन त्याच्याशी बोलू शकता. किंवा कानात घालून गाणी ऐकू शकता.
आजकाल लोकांना पारंपरिक घड्याळांऐवजी स्मार्ट वॉच घालायला आवडते. कारण वेळ पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही त्यात तुमचा मोबाइल चालवू शकता. ते तुम्हाला फिटनेसच्याबाबतीतसुद्धा गाइड करते. तुम्ही दिवसभरात किती पावले चालला, तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची गती, तुमचा रक्तदाब इ सर्व माहिती मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावाला रक्षाबंधनाला एक स्मार्ट वॉच भेट देऊ शकता.
हे एक उत्तम गॅझेट आहे. जे जवळजवळ प्रत्येक तरुणाला आवडते. यामध्ये तुम्हाला लांब हेडफोन घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या कानात एक छोटेसे उपकरण लावावे लागेल आणि तुमचा संपूर्ण फोन त्याद्वारे ऑपरेट होईल. तुम्हाला गाणी ऐकायची असतील किंवा कोणाशी बोलायचे असेल तर ते खूप उपयुक्त आहे. यंदाच्या रक्षाबंधनला तुम्ही भावासाठी हे खरेदी करू शकता.