Raksha Bandhan Beauty Tips: रक्षाबंधनाला सुंदर दिसण्यासाठी घरीच फेस पॅक लावताय? या चुकांमुळे हरवू शकते चेहऱ्याची चमक-raksha bandhan beauty tips you should avoid these mistakes while applying face pack ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raksha Bandhan Beauty Tips: रक्षाबंधनाला सुंदर दिसण्यासाठी घरीच फेस पॅक लावताय? या चुकांमुळे हरवू शकते चेहऱ्याची चमक

Raksha Bandhan Beauty Tips: रक्षाबंधनाला सुंदर दिसण्यासाठी घरीच फेस पॅक लावताय? या चुकांमुळे हरवू शकते चेहऱ्याची चमक

Aug 15, 2024 02:59 PM IST

Face Pack Apply Mistakes: रंग सुधारण्यासाठी फेस पॅक लावला जातो. पण ते लावताना काही चुका टाळल्या पाहिजेत. या रक्षाबंधनला घरी फेस पॅक लावणार असाल तर आधी जाणून घ्या.

फेस पॅक लावताना होणाऱ्या चुका
फेस पॅक लावताना होणाऱ्या चुका (pexels)

Avoid These Mistakes While Applying Face Pack: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी क्लीनअप आणि फेशियल केले जाते. चेहरा सुंदर बनवण्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही फेस पॅकचा वापर करतात. यामुळे चेहऱ्याची चमक कायम राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. मात्र ते लावताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण फेस पॅक लावल्यानंतर चूक झाली तर चेहऱ्याची चमक हरवू शकते. तुम्ही या रक्षाबंधनला सुंदर दिसण्यासाठी घरी फेस पॅक लावण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या फेस पॅक लावल्यानंतर कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

हात आणि चेहरा न धुणे

घाणेरडे हात आणि घाणेरड्या चेहऱ्यावर फेस पॅक लावणे ही मोठी चूक आहे. घाणेरड्या हाताने मास्क लावल्याने चेहऱ्यावर जंतू जमा होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिक घाणेरडी होऊ शकते. मास्क किंवा पॅक लावण्यासाठी आपले हात चांगले धुवा किंवा फ्लॅट ब्रश वापरा. घाणेरड्या आणि तेलकट चेहऱ्यावर फेस मास्क लावल्याने फायदा होणार नाही आणि छिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे चेहरा नीट स्वच्छ केल्यानंतर फेस पॅक लावा.

खूप जास्त वेळ लावून ठेवणे

फेस मास्क जास्त वेळ लावू नका. मास्क चेहऱ्यावर बराच वेळ ठेवल्यास त्वचेची जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. जर तुम्ही पॅकेट मास्क लावत असाल तर पॅकेटच्या मागील बाजूस दिलेले डारेक्शन फॉलो करा.

मास्क काढल्यानंतर स्टेप्स फॉलो न करणे

ही तुमच्या स्किन केअर रूटीनची शेवटची स्टेप आहे. मात्र, मास्क लावल्यानंतर स्टेप्स फॉलो करा. यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. मास्क काढल्यानंतर हायड्रेटिंग लाइट मॉइश्चरायझर लावा.

रोज लावणे

रोज फेस पॅक लावल्याने चेहरा चमकेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय फेस पॅकचा वारंवार वापर केल्यास जळजळ सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पॅक वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)