Raksha Bandhan Makeup: रक्षाबंधनाच्या दिवशी मेकअप करताना फॉलो करा 'हे' हॅक्स, दिवसभर दिसेल ग्लो-raksha bandhan 2024 try these makeup hacks to stay your look last longer and sweat proof ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raksha Bandhan Makeup: रक्षाबंधनाच्या दिवशी मेकअप करताना फॉलो करा 'हे' हॅक्स, दिवसभर दिसेल ग्लो

Raksha Bandhan Makeup: रक्षाबंधनाच्या दिवशी मेकअप करताना फॉलो करा 'हे' हॅक्स, दिवसभर दिसेल ग्लो

Aug 17, 2024 02:02 PM IST

Makeup Hacks for Raksha Bandhan: रक्षाबंधनाला मेकअप बराच काळ टिकावा आणि घामाने वाहू नये यासाठी हे मेकअप हॅक्स लक्षात ठेवा.

रक्षाबंधनासाठी मेकअप हॅक्स
रक्षाबंधनासाठी मेकअप हॅक्स (unsplash)

Raksha Bandhan Makeup Look: दरवर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याच्या वेळेबाबत संभ्रम असतो. अशा वेळी मुलींना सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे किती वाजता रेडी व्हावे. अशा वेळी काही मेकअप हॅक्स तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत करतील. जेणेकरून तुम्हाला हवं तेव्हा राखी बांधायला तयार असाल आणि मेकअपची चमक दिवसभर कायम राहील. या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यापूर्वी हे मेकअप हॅक्स ट्राय करा.

मस्कारा लावताना घ्या काळजी

मस्कारा लावताना अनेकदा पापण्यांवर ते जास्त लागते. ज्यामुळे पापण्या बल्की दिसू लागतात. अशा प्रकारच्या मस्कारा ब्लंडर टाळायचे असेल तर आधी टिशू पेपरवर मस्कारा हलकेच पुसून घ्या. जेणेकरून सर्व अतिरिक्त मस्कारा काढून टाकले जाईल आणि संपूर्ण ब्रशवर मस्कारा इव्हन थर राहील. ते लावताना पापण्यांवरही ते तितकेच दिसेल.

ब्लशर आणि हायलाइटर कसे लावावे

ब्लशर आणि हायलाइटर दोन्ही लावावे लागतात. पण ते लावताना अनेकदा गडबड होते. तर सर्वात स्मार्ट ट्रीक म्हणजे आपल्या हायलाइटरमध्ये ब्लश मिक्स करा. नंतर ते लावा. यामुळे हायलाइटर आणि ब्लशर या दोन्हींचा एकत्रित लूक मिळेल.

स्वस्त लिपस्टिकही दिवसभर निघणार नाही

लिपस्टिकची आवडती शेड ज्या कंपनीचा मिळतो तो अनेकदा लवकर निघून जाते. पण आता तसे होणार नाही. लिपस्टिक लावण्यापूर्वी फक्त ओठांवर लिपलाइनरची एक आउटलाइन बनवण्यासोबतच पूर्ण ओठांवरही फिल करून घ्या. नंतर लिपस्टिक लावा आणि वर टिश्यू ठेवून पावडर लावा. असे केल्याने लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ होईल आणि जास्त काळ टिकेल.

बेस लावताना करा ही गोष्ट

फाऊंडेशनचा बेस लावताना ग्लोइंग आणि शायनी त्वचेसाठी फ्रूट क्रीम एकत्र मिक्स करा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोइंग आणि शायनी दिसते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)