Ways To Apply Honey for Glowing Face: रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या सणाला चेहरा उजळवण्यासाठी तुम्हीही पार्लरमध्ये तासन्तास घालवत असाल तर तसे करू नका आणि फक्त घरी मधापासून बनवलेला फेस पॅक लावा. असे केल्याने चेहरा लगेच उजळून निघेल. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हनी फेस पॅक कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.
मुरुमांचा सामना करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हा सोपा मध फेस पॅक लावा. यासाठी एक चतुर्थांश चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध घाला. नंतर हे चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ मिनिटे राहू द्या. आता कोमट पाण्याने धुवून फेस वॉश करा. नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझरचा वापर करा.
चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मध आणि चंदन पावडरचा फेस पॅक बनवा. ते बनवण्यासाठी एक चमचा मध आणि चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा. हे चेहऱ्याला लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने आणि फेस क्लींजरने धुवून घ्या.
या घरगुती फेस पॅकने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी केशरचे काही धागे एक चमचा मधात सुमारे १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर चांगले मिक्स करा. हे चेहऱ्याला लावून १५ मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने धुवून फेस वॉश करा.
हा फेस मास्क लावून तुम्ही तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार बनवू शकता. यासाठी एक चमचा मॅश केलेल्या पपईच्या गरमध्ये फक्त एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी पुसून घ्या आणि पाण्याने चेहरा धुवा आणि फेस वॉश करा.
हा फेस पॅक लावल्यास त्वचा लगेच चमकदार होईल. याशिवाय त्वचाही मुलायम आणि कोमल राहील. यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा मध मिसळा. हे चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर धुवून टाका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)