Raksha Bandhan Fashion: अनन्या पांडे की जान्हवी कपूर, रक्षाबंधनला तयार होण्यासाठी कोणाचा लुक ट्राय कराल?-raksha bandhan 2024 fashion tips you can take outfit ideas from janhvi kapoor and ananya panday latest look ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raksha Bandhan Fashion: अनन्या पांडे की जान्हवी कपूर, रक्षाबंधनला तयार होण्यासाठी कोणाचा लुक ट्राय कराल?

Raksha Bandhan Fashion: अनन्या पांडे की जान्हवी कपूर, रक्षाबंधनला तयार होण्यासाठी कोणाचा लुक ट्राय कराल?

Aug 16, 2024 09:05 PM IST

Raksha Bandhan Outfit Ideas: रक्षाबंधनाला साडी नेसून तयार व्हायचं असेल तर तुम्ही अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरच्या या लूकवरून टिप्स घेऊ शकता.

अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर
अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर

Janhvi Kapoor and Ananya Panday Latest Look: रक्षाबंधनाला रेडी होण्यासाठी मुली बरीच तयारी करतात. जर तुम्ही ही यंदाच्या रक्षाबंधनाला साडी नेसण्याचा विचार करत असाल तर अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरचा हा लूक तुम्ही नक्कीच कॉपी करू शकता. जान्हवी कपूरचा लूक त्या मुलींसाठी बेस्ट आहे जे लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी येणार असतील. तर अनन्या पांडेचा लुक ट्राय करून तुम्ही स्टायलिश दिसू शकता.

अनन्या पांडेचा परफेक्ट फॅशनेबल लुक

अनन्या पांडेप्रमाणेच स्लीव्हलेस नूडल्स स्ट्रॅप ब्लाऊजसोबत साडी मॅच करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण लुक मिनिमाइज करण्यासाठी अगदी मिनिमम ग्लॉसी मेकअप आणि लाँग इयररिंग्स निवडा. पण नेकपीस आणि बांगड्या स्किप करा. तसेच अनन्या पांडेची हेअरस्टाईलही मुलींसाठी परफेक्ट आहे. गरमी टाळण्यासाठी लो स्लीक सेंटर पार्टिशन बन बनवा. अनन्या पांडेचा हा लूक रक्षाबंधनासाठी एकदम परफेक्ट आहे, जो मुली सहज कॉपी करू शकतात.

न्यू ब्राइड होऊ शकतात जान्हवी कपूरसारखे रेडी

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी जात असाल तर जान्हवी कपूरचा हा लूक एकदम परफेक्ट आहे. लाल रंगाची साडी आणि विरुद्ध रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाउज निवडा. ज्यावर हेवी भरतकाम केलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साडीसोबत ब्लाऊज मिक्स अँड मॅच करू शकता. जान्हवी कपूरने लूक युनिक करण्यासाठी इयररिंग्ससह सपोर्टर केसांमध्ये फिक्स केले आहे, जे अतिशय पारंपारिक आणि सुंदर लुक देत आहे. हा लूक तुम्ही सुद्धा यंदाच्या रक्षाबंधनात ट्राय करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)