Rakhi Sawant: 'मी भिकारी झाले..' म्हणत ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे नेमकं प्रकरण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: 'मी भिकारी झाले..' म्हणत ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे नेमकं प्रकरण?

Rakhi Sawant: 'मी भिकारी झाले..' म्हणत ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे नेमकं प्रकरण?

Nov 09, 2024 12:32 PM IST

Rakhi Sawant Ex Husband: राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, अटक होण्याच्या भीतीने ती आपल्या देशात परतत नाहीये.

Rakhi Sawant Viral Video
Rakhi Sawant Viral Video (instagram)

Rakhi Sawant Viral Video: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून दुबईत अडकली आहे. राखीला भारतात परतायचे आहे. त्यासाठी तिने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले होते. दरम्यान आता, राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, अटक होण्याच्या भीतीने ती आपल्या देशात परतत नाहीये. राखी सावंतने मुलाखतीत सांगितले की, ती जर भारतात परतली तर तिला अटक केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, राखी सावंतवर अनेक खटले सुरू आहेत. ज्यामध्ये तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी याने दाखल केलेल्या एफआयआरचाही समावेश आहे.

शाहरुख खान-सलमान खान लगेच मिळवून देतील जामीन-

भारतात परतण्याच्या मुद्द्यावर, जेव्हा राखी सावंतला विचारण्यात आले की, बॉलीवूडमधील तिच्या जवळचे लोक सलमान भाऊ आहेत की त्यांच्यासारखे कोणीतरी इतर? या प्रश्नावर राखी सावंत लगेच अडवते आणि म्हणते, 'नाही, मी कोणाची मदत मागत नाही. हे माझे युद्ध आहे. सलमान भाऊ, फराह खान, शाहरुख हे मला एका सेकंदात जामीन मिळवून देतील. पण मी कोणाचीही मदत मागत नाही. असे सांगताना राखी सावंतच्या डोळ्यात पाणी आले. आणि अभिनेत्री कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली. इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

'मी किती दिवस भीक मागत राहणार'-

मुलाखतीत रडत रडत राखी सावंत पुढे म्हणाली, 'मी किती दिवस सर्वांसमोर हात पसरत राहीन, किती दिवस भीक मागत राहीन. मी लोकांच्या उपकारांवर जगणारी जगणारी भिकारी झालो आहे. माझा भारताच्या कायद्यावर विश्वास आहे, माझा कोणताही गुन्हा नसताना मला शिक्षा का?

एक्स पती आदिल खान दुर्रानीने राखी सावंतवर केलाय फसवणुकीचा आरोप-

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद संपत नाहीयेत. राखीने फसवणूक केल्याचा आरोप करत आदिलने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वास्तविक, माजी पतीचा आरोप आहे की राखीने दुबईमध्ये खरेदी केलेली मालमत्ता त्याची आहे. ती अभिनेत्रीने जबरदस्तीने ताब्यात घेतली आहे. राखीविरुद्ध भारतात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यामुळे ती आपल्या देशात परतत नाहीये.

Whats_app_banner