Radish Side Effects: मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Radish Side Effects: मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Radish Side Effects: मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Oct 21, 2024 11:19 AM IST

Radish Side Effects :आरोग्यासाठी इतका फायदेशीर असूनही, जर चुकीच्या गोष्टींसोबत मुळ्याचे सेवन केले, तर त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया अशाच '५' पदार्थांबद्दल, ज्यांच्यासोबत मुळ्याचे सेवन केले जाऊ शकत नाही.

Radish Side Effects
Radish Side Effects (shutterstock)

Radish Harmful Side Effects : हिवाळा सुरू होताच कोशिंबीर आणि पराठ्याची चव वाढवणारा मुळाही बाजारात भरपूर प्रमाणात दिसू लागतो. मुळ्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे चवीबरोबरच आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. मुळ्याच्या सेवनाने गॅसची समस्याही दूर होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून, पचनसंस्था निरोगी राहते. आरोग्यासाठी इतका फायदेशीर असूनही, तुम्हाला माहित आहे का की जर मुळ्याचे सेवन चुकीच्या गोष्टींसोबत केले, तर त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते. जाणून घेऊया, अशाच ५ पदार्थांबद्दल ज्यांच्यासोबत मुळ्याचे सेवन करू नये.

‘या’ गोष्टींसोबत चुकूनही खाऊ नका मुळा!

मुळ्यासोबत दूध

मुळा कच्चा किंवा त्यापासून बनवलेली कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. असे केल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा समस्या बऱ्या होण्यास कधी कधी बराच वेळ लागू शकतो.

मुळ्यासह संत्री

मुळ्याबरोबर संत्रा खाणे देखील टाळावे. मुळासोबत संत्री खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. यामुळे तुम्हाला तीव्र वेदना देखील होऊ शकतात. यामुळे हे दोन घटक एकत्र खाणे टाळा.

Mosquito Bite : डेंग्यू, मलेरियाचे डास नेमके कोणत्या वेळी चावतात माहीत आहे का? असा करा स्वतःचा बचाव

मुळा आणि कारलं

हिवाळ्यात पराठ्याबरोबर कारल्याची भाजी खायला खूप चविष्ट लागते. पण, मुळ्याच्या पराठ्यासोबत किंवा कोशिंबिरीसोबत चुकूनही कारली खाण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने त्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी ही समस्या आणखी वाढू शकते.

मुळा आणि पनीर

हिवाळ्यात मुळा आणि पनीर या दोन्ही पदार्थांपासून बनवलेले पराठे सगळेच खूप आवडीने खातात. पण, जर तुम्ही मुळ्याचे सेवन करत असाल, तर त्यानंतर पनीरचे सेवन करणे टाळावे. हे दोन्ही घटक एकत्र खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीस त्वचेशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

मुळ्यासोबत चहा

मुळ्यासोबत चहाचे मिश्रण अत्यंत धोकादायक मानले जाते. दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. यामागचे कारण म्हणजे मुळ्याचा प्रभाव थंड असतो, तर चहाचा प्रभाव उष्ण असतो. या दोघांच्या विरोधाभासामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चुकूनही चहासोबत मुळ्याचा पराठा खाऊ नका. 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner