Radhika Merchant Look: राधिका मर्चंटने बिदाईच्या वेळी घालता खास लाल लेहंगा, पाहा अंबानीच्या धाकट्या सुनेचा रॉयल लूक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Radhika Merchant Look: राधिका मर्चंटने बिदाईच्या वेळी घालता खास लाल लेहंगा, पाहा अंबानीच्या धाकट्या सुनेचा रॉयल लूक

Radhika Merchant Look: राधिका मर्चंटने बिदाईच्या वेळी घालता खास लाल लेहंगा, पाहा अंबानीच्या धाकट्या सुनेचा रॉयल लूक

Jul 13, 2024 11:37 AM IST

Anant Radhika Wedding: राधिका मर्चंटने लग्नासाठी पांढरा आणि लाल रंगाचा लेहंगा घातला होता. पण बिदाईच्या वेळी ती सिंदूरी लाल रंगाचा लेहंगामध्ये दिसली. पाहा काय आहे या लेहंगाची विशेषता.

राधिका मर्चंटचा बिदाई लूक
राधिका मर्चंटचा बिदाई लूक

Radhika Merchant Vidai Look: राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा १२ जुलै रोजी पार पडला. लग्नाआधी राधिकाचा फर्स्ट लूक समोर आला तेव्हा सर्वांचे डोळे दिपले. तिने पारंपारिक लेहंगा परिधान केला होता. पण तिने बिदाई म्हणजेच पाठवणीच्या वेळी वेगळा लेहंगा घातला होता. त्या लेहंगामध्ये सुद्धा तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. अंबानी कुटुंबात जाण्यापूर्वी राधिका मर्चंट हिने सौभाग्याचे चिन्ह मानला जाणारा लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यावेळीही त्यांनी शाही ज्वेलरी कॅरी केली.

 

राधिका मर्चंटचा लग्न आणि बिदाई लूक
राधिका मर्चंटचा लग्न आणि बिदाई लूक

सोनेरी नक्षीने बनवला लेहंगा

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात जे रंग दिसतात तेच रंग राधिका मर्चंटच्या बिदाईच्या लेहंग्यासाठी निवडले होते. या रॉयल लेहेंगा वर सोनेरी भरतकाम करण्यात आले होते. ज्यासोबत तिने हाय नेक फुल स्लीव्ह्स ब्लाऊज घातला होता. त्यात अस्सल सोन्याच्या तारांसह पारंपारिक कार्चोबी एम्ब्रॉयडरी केली होती. याची कारागिरी १९ व्या शतकातील गुजरातमधील प्रसिद्ध स्टिचपासून प्रेरित होती.

राधिका मर्चंटचा रॉयल लूक
राधिका मर्चंटचा रॉयल लूक

राधिकाने असा पूर्ण केला लूक

राधिकाने बनारसी सिल्क दुपट्टा आणि जाळीच्या डिझाइन असलेल्या घुंघट सोबत आपला हा लूक पूर्ण केला. हा दुपट्टा अस्सल सोन्याच्या भरतकामाने आणि रेशमच्या कामाने सजलेला आहे, जो राधिकाने तिच्या खांद्यावर आणि हातांभोवती गुंडाळला आहे. शिवाय तिने मोठा ट्रेल घुंघटसोबत बिदाईचा हा लूक पूर्ण केला.

अंबानी कुटूंबाच्या धाकट्या सूनेचा शाही लूक
अंबानी कुटूंबाच्या धाकट्या सूनेचा शाही लूक

मनीष मल्होत्राने डिझाईन केला लेहंगा

राधिका मर्चंटचा हा लेहंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. या लेहंगासोबत बॅकलेस ब्लाउज देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा ब्रोकेड सिल्क लेहंगा म्हणजे भारताच्या कालातीत सौंदर्याला श्रद्धांजली आहे. यात बनारसी ब्रोकेड प्रिंटने सजवलेले अनेक पॅनेल आहेत.

Whats_app_banner